IMPIMP

Pune Crime | तोतया वकिल दाम्पत्याने बनावट रजिस्टेशन करुन केली व्यावसायिकाची 13 लाखांची फसवणूक

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | वकील असल्याची बतावणी करून १३ फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन देतो असे सांगून बनावट कागदपत्रे बनवून एका बांधकाम व्यावसायिकाची १३ लाख रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

अमित दत्तात्रय घुले Amit Dattatraya Ghule (वय ४२, रा. मांजरी बु़ ता. हवेली) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी
प्रसन्न शिरुडकर Prasanna Shirudkar (वय ४१) आणि शर्वरी प्रसन्न शिरुडकर Sherwari Prasanna Shirudkar (वय ४०, दोघे रा. अ‍ॅड्रसेस
सोसायटी, मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित घुले हे त्यांच्या ओळखीच्या अ‍ॅड. पठाण यांच्याकडे गेले असताना तेथे शर्वरी
शिरुडकर व प्रसन्न शिरुडकर यांची फिर्यादीशी ओळख झाली. त्यांनी आम्ही वकील असल्याचे सांगून त्यांच्याशी ओळख वाढविली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तुमचे दस्त रजिस्ट्रेशन करुन देतो, असे सांगितले. ते वकील नसताना फिर्यादी यांच्या मांजरी बु़ येथील शारदा कॉम्प्लेक्स व शारदा सुमन आर्केड या बिल्डिंगमधील १३ फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून सात बारा उतारा, ८ अ उतारा अशी कागदपत्रे तसेच फ्लॅट विक्रीचे मुळ दस्त
घेऊन ७ फ्लॅटचे १८ मे व १९ मे २०२१ या दोन दिवसात दापोडी येथील दुय्यम निबंधक कार्यालय,
हवेली क्रमांक २५ येथे बनावट रेरा व पीएमआरडीए नोंदणीचे कागदपत्रे बनवून त्यांचा वापर करुन
रजिस्ट्रेशन करुन फिर्यादी यांची १३ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पोलीस निरीक्षक
जितेंद्र कदम (Police Inspector Jitendra Kadam) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Prasanna Shirudkar and Sherwari Prasanna Shirudkar cheated the businessman of Rs 13 lakh by making fake registration

 

हे देखील वाचा :

Police Transfer | ‘बिग बी’ अमिताभच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसाची वर्षाला दीड कोटीची कमाई, तडकाफडकी बदली; जाणून घ्या प्रकरण

Mysuru Rape Case | बलात्कारप्रकरणी मंत्र्याचा अजब सवाल; म्हणाले – ‘सुर्यास्तानंतर ती तिथे गेलीच का?’

Financial Tasks | सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी पूर्ण करा आपल्या पैशांशी संबंधीत ही 5 कामे, जाणून घ्या कोणती

 

Related Posts