IMPIMP

Parambir Singh Case | चांदीवाल कमीशनने परमबीर सिंह यांच्याविरूद्ध जारी केले वॉरंट

by nagesh
Parambir Singh Case | chandiwal commission issues warrant against former commissioner parambir singh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Parambir Singh Case | चांदीवाल कमीशन (Chandiwal Commission) ने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (former commissioner Parambir Singh case) यांच्याविरूद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. कमीशनने 50 हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. सोबतच महाराष्ट्राच्या डीजीपींना (DGP) आदेश दिला आहे की त्यांनी एखाद्या वरिष्ठ अधिकार्‍याला हे वॉरंट देण्यासाठी डेप्यूट करावे.

 

 

आयोगासमोर हजर होण्यास टाळाटाळ

यापूर्वी सुद्धा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध भ्रष्टाचारच्या प्रकरणात चांदीवाल चौकशी आयोगाच्या समोर परमबीर सिंह हजर झाले नव्हते. आयोगाने याबाबत सिंह यांच्याविरूद्ध कठोर भूमिका घेत म्हटले होते की, पुढील सुनावणीत सिंह हजर झाले नाही तर त्यांच्याविरूद्ध वॉरंट जारी केले जाईल.

 

 

अनिल देशमुखांवर केला होता वसूलीचा आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपये वसूलीचा गंभीर आरोप केला होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 समांतर न्यायालयीन चौकशी

हायकोर्टने या प्रकरणात दाखल याचिकेवर सीबीआय चौकशीचे सुद्धा निर्देश दिले. राज्य सरकारने मुंबई हायकोर्टचे सेवानिवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाच्या माध्यमातून आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशी सुरू केली आहे. चौकशी आयोगाने सिंह यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

 

 

ED करणार देशमुखांच्या संबंधीत लोकांची चौकशी

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरूद्ध मनी लाँडरिंग, भ्रष्टाचार आणि इतर आरोपाखाली दाखल प्रकरणात आपल्या तपसाच्या कक्षा वाढवल्या आहेत, ज्या अंतर्गत ईडी आता त्यांच्या संबंधीत इतर लोकांची चौकशी करत आहे.

ईडीद्वारे केली जात असलेली चौकशी 100 कोटी रुपयांच्या कथित लाच आणि वसूली रॅकेटशी संबंधित आहे, ज्यामुळे देशमुख यांना एप्रिलमध्ये मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

 

 

अनिल परब यांनाही ईडीचे समन्स

ईडीने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनाही मागील महिन्यात समन्स पाठवले
होते, परंतु ते आपल्या अधिकृत जबाबदार्‍यांचा संदर्भ देऊन हजर झाले नाहीत.

56 वर्षीय परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये संसदीय कार्यमंत्री सुद्धा आहेत
आणि असे म्हटले जात आहे की त्यांनी एजन्सीच्या समोर हजर होण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ मागितला
आहे.

 

Web Title : Parambir Singh Case | chandiwal commission issues warrant against former commissioner parambir singh

 

हे देखील वाचा :

Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण ! आरोपींना वकील आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी न्यायालयाने दिला वेळ, आता ‘या’ तारखेला आरोप निश्चिती

ICRA | ऑगस्टमध्ये वाढली देशांतर्गत हवाई वाहतूक, झाली 31 टक्केची वाढ

OMG ! एकाच मुलासोबत लग्न करण्यासाठी आडून बसल्या दोन मुली, मग टॉस उडवून निवडली वधू!

 

Related Posts