IMPIMP

Pune Crime | भाच्याकडून मामाच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करुन खुनाचा प्रयत्न

by bali123
Pune Crime | murder of a woman who refuses to have an affair the accused fled after throwing the body in the bathroom in lohegaon of vimannagar police station limits

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पत्र्याच्या शेडची तोडफोड का केली असे विचारल्याने भाच्याने मामाच्या डोक्यात कुर्‍हाडेने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी यवत पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

नागेश मारुती पवार ऊर्फ कचरे, शंकर मारुती पवार ऊर्फ कचरे आणि मारुती माणिक पवार ऊर्फ कचरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दिगंबर बलाशा काळे (वय ३५, रा. वाखारी, आनंदग्राम, ता. दौंड मुळ रा. पिंपळवाडी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दिगंबर काळे हे मजुरी काम करतात. त्यांची खुटबाव साळोबा वस्तीमध्ये पत्र्याची शेड आहे. या पत्र्याची शेडची तोडफोड करण्यात आली. याबाबत काळे यांनी गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपला भाचा नागेश पवार याच्याकडे विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्यांनी केबल वायरने मारहाण केली. आम्ही तुला आज मारुनच टाकतो, तुला संपवतोच, असे म्हणून त्याने काळे यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने मारुन गंभीर जखमी केले.
तसेच शंकर मारुती पवार याने कोयत्याचे चपटे बाजूने त्यांच्या कमरेवर मारहाण केली.
दिगंबर काळे हे गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title :- pune crime | attempt to murder news

Pune Police | कोण ठरणार ‘ते’ 75 ‘भाग्यवान’ पोलीस अंमलदार; पुणे शहर पोलीस दलात उत्सुकता

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरून 19 वर्षीय पत्नीचा खून; पुण्याच्या वडगाव धायरी परिसरातील घटना

Pune Police | सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित 

Related Posts