IMPIMP

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरून 19 वर्षीय पत्नीचा खून; पुण्याच्या वडगाव धायरी परिसरातील घटना

by bali123
https://policenama.com/pune-crime-murder-of-a-woman-who-refuses-to-have-an-affair-the-accused-fled-after-throwing-the-body-in-the-bathroom-in-lohegaon-of-vimannagar-police-station-limits/

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | प्रेम विवाह केलेल्या दाम्पत्यामधील पतीच्या मानगुटीवर बसलेल्या संशयाच्या भुताने 19 वर्षीय पत्नीचा बळी घेतला आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना वडगाव धायरी (Pune Crime) येथे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

निशा अजय निकाळजे (वय 19) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती विजय निकाळजे (वय 21) याच्याकडे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आणि निशा यांचा प्रेमविवाह झाला होता. काही महिन्यांपूर्वीच ते जनता वसाहत येथून वडगाव धायरी (vadgaon dhayari) येथील एका चाळीत राहण्यास आले होते. त्या ठिकाणी त्यांचा संसार सुरू झाला होता. मात्र, अजय हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तू मोबाईल वर कोणाशी बोलत असतेस असे म्हणून सातत्याने तिच्या सोबत भांडण करीत होता. शुक्रवारी देखील या दोघांमध्ये वाद झाले. त्यावेळी त्याने गळा आवळून तिचा खून केला.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धावले.
त्यांनी निशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला.
ससून रुग्णालयातून एमएलसी रिपोर्ट आल्यानंतरच हा खून आहे की आत्महत्या याबाबत स्पष्टपणे सांगता येईल.
तोपर्यंत आम्ही अधिकृतपणे हा कोण आहे असे सांगू शकत नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे (senior police inspector devidas gheware) यांनी सांगितले.
दरम्यान, सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Police Station) कोणाची शक्यता गृहीत धरून अजय याच्याकडे चौकशीला सुरुवात केली आहे.

Web Title :- pune crime | murder of wife by husband in vadgaon dhayari area of pune

 

Pune Police | सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 216 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 167 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी 

Related Posts