IMPIMP

Pune Police | कोण ठरणार ‘ते’ 75 ‘भाग्यवान’ पोलीस अंमलदार; पुणे शहर पोलीस दलात उत्सुकता

by bali123
Coronavirus Maharashtra Police | More than 1000 police officers in the state have been infected with the corona 316 officers infected with some IPS 276 infected in 24 hours

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Police | शिवाजीनगर पोलीस वसाहतीमधील ‘शिवनेरी’ आणि ‘राजगड’ या नवीन व अत्याधुनिक निवासस्थानातील इमारतीत आपल्याला घर मिळावे, अशी मनिषा 452 पोलीस अंमलदारांनी (Pune Police) व्यक्त केली आहे. त्यांच्या पैकी 75 भाग्यवान कोण ठरणार, या विषयी शहर पोलीस दलात उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीतील जुन्या बैठ्या चाळी पाडून त्या जागी बहुमजली अत्याधुनिक दोन इमारती उभ्या राहिल्या आहेत. गॅस पाईपलाईनपासून अग्निशमन विरोधी यंत्रणा व व्यावसायिक इमारतींमध्ये असलेल्या सर्व सुखसुविधा या इमारतींमधील फ्लॅटमध्ये आहेत. या दोन्ही इमारतीमधील प्रत्येक इमारतीमध्ये 84 फ्लॅट आहेत. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या हस्ते औपचारिकरित्या हस्तांतरण करण्यात आले होते. त्यावेळी अनेकांना फ्लॅटच्या चाव्या देण्यात आल्या.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

या इमारतीतील उर्वरित 75 निवासस्थानांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शहर पोलीस दलातील पोलीस अंमलदारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याला तब्बल 452 अंमलदारांनी प्रतिसाद देत अर्ज सादर केले आहेत. या इमारतीतील फ्लॅट आपल्याला मिळावा, अशी त्यांची मनिषा आहे. त्यामुळे हे वाटप लकी ड्रॉ पद्धतीने करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. हा लकी ड्रॉ सोमवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कॉप्स एक्सलंस हॉल येथे होणार आहे. हा लकी ड्रॉ पारदर्शक पद्धतीने व्हावा, याचा प्रयत्न आहे.
यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी, पोलीस मुख्यालय – ५, गुन्हे शाखा,
वाहतूक व विशेष शाखेकडील प्रत्येकी -2 आणि मोटार परिवहन विभागातील 2 कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत हा लकी ड्रॉ होणार आहे.
या लकी ड्रॉमध्ये कोणाचा नंबर लागतो व या अलिशान निवासस्थानात रहायला जायची संधी कोणाला मिळते,
याविषयी शहर पोलीस दलात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title :- pune police | who are 75 lucky police in pune city

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरून 19 वर्षीय पत्नीचा खून; पुण्याच्या वडगाव धायरी परिसरातील घटना

Pune Police | सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 216 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी 

Related Posts