IMPIMP

Pune Crime | लोणावळ्यात 4 कोटींची रोकड जप्त, दोघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Cheating With Retired Assistant Commissioner of Police; Extortion was threatened with financial loss

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका संशयित कार मधून पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural
Police) लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala Rural Police) चार कोटी रुपयांची रोकड जप्त (Four Crore Cash Seized) केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरुन (Mumbai – Pune Expressway) अवैध शस्त्र व पैशांची
बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती पुणे ग्रामिण पोलिसांना (Pune Crime) मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.28) रात्री ही कारवाई
करण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महेश नाना माने Mahesh Nana Mane (रा. विटा. जि. सांगली – Sangli), विकास संभाजी घाडगे Vikas Sambhaji Ghadge (रा. शेटफळ, जि. सांगली) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावरुन अवैध शस्त्र व पैशांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सोमवारी रात्री महामार्गावर पथक तैनात करण्यात आले. मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या एका संशयित स्विफ्ट कार Swift Car (KA 53 MB 8508) ताब्यात घेण्यात आली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये चार कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. ही सर्व रक्कम पाचशे रुपयांच्या चलनात आहे.(Pune Crime)

 

 

पैशांबाबत कार चालक महेश माने आणि विकास घाडगे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यांनी एवढी मोठी रक्कम कुठून कुठे व कोणत्या कारणासाठी नेत होते. तसेच आवश्यक कागदपत्रे आणि वाहतुक परवाना बाबत आरोपींनी समाधानकारक कारण दिले नाही. याप्रकरणी हवालाचा प्रकार आहे का याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान या रक्कमेसंदर्भात पोलिसांनी आयकर विभागाला (Income Tax Department) माहिती दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (SP Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte), लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील (Lonavla Sub-Divisional Police Officer Rajendra Patil), पोलीस निरीक्षक प्रविण मोरे (Police Inspector Pravin More) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर (PSI Sachin Bankar), अनिल लवटे, कर्मचारी सितारमा बोकड, युवराज बनसोडे, अमित ठोसर, पुष्पा घुगे, गणेश होळकर, किशोर पवार, सिद्धेश्वर शिंदे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | four crore cash seized lonavala pune rural police mumbai pune expressway

 

हे देखील वाचा :

IRCTC Indian Railway Rule | ट्रेनमध्ये प्रवास करताना सामान झाले असेल चोरी तर काळजी करू नका, रेल्वे देईल भरपाई!

Sanjay Dutt Viral News | संजूबाबाच्या ‘या’ हरकतीमुळं स्वत:ला थांबवू शकली नाही पत्नी मान्यता, वयाच्या 62 व्या वर्षी त्यानं ओलांडल्या सर्व मर्यादा

Pune Water Supply | प्रभात रस्ता परिसरातील 60 वर्षे जुनी ‘खापरा’ची पाईपलाईन फुटली होती; पाणी पुरवठा विभागाच्या हेल्पलाईनवर पहिल्याच दिवशी तक्रारींचा पाऊस

 

Related Posts