IMPIMP

IRCTC Indian Railway Rule | ट्रेनमध्ये प्रवास करताना सामान झाले असेल चोरी तर काळजी करू नका, रेल्वे देईल भरपाई!

by nagesh
Nanded to Pune Railway | good news for train passengers nanded hadapsar train will now run daily to pune

नवी दिल्ली : वृत्तसंस्था IRCTC Indian Railway Rule | रेल्वे सेवेचा दररोज लाखो प्रवासी (Railway Passenger) वापर करतात. रेल्वे ही भारताची जीवनवाहिनी मानली जाते. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून (IRCTC Indian Railway Rule) विविध प्रयत्न केले जातात. प्रवासात अनेक वेळा अनेक प्रवाशांचे सामान चोरीला जाते किंवा हरवले जाते. (Railway Passengers’ luggage is stolen or lost)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

पण, तुम्हाला हे माहीत आहे का की, रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनमध्ये तुमचे कोणतेही सामान चोरीला गेले तर अशा स्थितीत रेल्वे तुम्हाला चोरीच्या सामानाची भरपाई देते. बहुतांश प्रवाशांना या नियमाची माहिती नसते.

 

जर एखाद्या प्रवाशाचे सामान ट्रेन किंवा रेल्वे स्टेशनवर चोरीला गेले, तर अशा स्थितीत, ते न मिळाल्यास प्रवाशी त्याच्या चोरीच्या सामानासाठी दावा करू शकतो. 6 महिन्यांत सामान न मिळाल्यास तो ग्राहक मंचाकडेही जाऊ शकतो. (IRCTC Indian Railway Rule)

 

रेल्वेचे सामानाच्या चोरीचे आवश्यक नियम आणि त्या संदर्भात भरपाईबद्दल जाणून घेवूयात-

सामानाची चोरी झाल्यास मिळते भरपाई (Compensation for theft of luggage)
रेल्वे स्थानक किंवा ट्रेनमधील सामानाची चोरी झाल्यास, रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवता येईल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने जारी केला आहे.

 

तेथे प्रवाशाला एक फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म भरून आणि तक्रार दाखल केल्यानंतरही जर तुमची सुनावणी झाली नाही, तुम्हाला तुमचे सामान मिळाले नाही, तर अशावेळी तुम्ही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असाल. यानंतर, तुमच्या हरवलेल्या वस्तूची किंमत मोजली जाईल आणि त्यानंतर त्याची भरपाई दिली जाईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ऑपरेशन अमानत
याशिवाय लोकांच्या हरवलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी ऑपरेशन अमानत नावाची मोहीम सुरू केली आहे.
या अंतर्गत, रेल्वे पोलीस, हरवलेली वस्तू मिळाल्यास,
ती त्यांच्याकडे सुरक्षित ठेवतात आणि त्या वस्तूचा फोटो रेल्वे झोनच्या अधिकृत वेबसाइट (Official Website) वर शेअर करतात.

 

या साइटला भेट देऊन, तुम्ही फोटो पाहून तुमचे सामान ओळखू शकता. यानंतर तुम्ही स्टेशनवर जाऊन तो माल सहज मिळवू शकता.

 

 

Web Title :- IRCTC Indian Railway Rule | irctc indian railway rule if your luggage is stolen in railway station or on train then you can claim for compensation

 

हे देखील वाचा :

Sanjay Dutt Viral News | संजूबाबाच्या ‘या’ हरकतीमुळं स्वत:ला थांबवू शकली नाही पत्नी मान्यता, वयाच्या 62 व्या वर्षी त्यानं ओलांडल्या सर्व मर्यादा

Pune Water Supply | प्रभात रस्ता परिसरातील 60 वर्षे जुनी ‘खापरा’ची पाईपलाईन फुटली होती; पाणी पुरवठा विभागाच्या हेल्पलाईनवर पहिल्याच दिवशी तक्रारींचा पाऊस

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता कारागृहातील कैद्यांना मिळणार कर्ज; देशातील पहिलीच योजना

 

Related Posts