IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – सिगारेटला २० रुपये न दिल्याने आईचा हात केला फ्रॅक्चर

by nagesh

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime News | सिगारेट (Cigarette) घेण्यासाठी आईने २० रुपये दिले नाही, म्हणून थोरल्या मुलाने लाकडी बाबुंने आपल्या आईच्या हाताचे मनगटावर जोरात मारुन त्यांचा हात फ्रॅक्चर केल्याचा प्रकार कोंढव्यात घडला.

याबाबत सखुबाई राजाराम कांबळे (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५३९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माधव राजाराम कांबळे Madhav Rajaram Kamble (वय २७) याच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी असताना त्यांचा मोठा मुलगा माधव कांबळे
याने त्यांच्याकडे सिगारेटसाठी २० रुपये मागितले. त्यांनी न दिल्याने त्याने आरडाओरडा केला.
तेव्हा फिर्यादी यांचा लहान मुलगा शंकर याने त्याला बाहेर जा , असे सांगितले. तेव्हा माधव हा बाहेरुन लाकडी बांबु घेऊन आला. त्याने फिर्यादी यांच्या हाताचे मनगटावर जोरात मारला. त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Kondhwa Police Station – Mother’s hand fractured for not paying Rs 20 for cigarettes

Related Posts