IMPIMP

Pune Crime | रिक्षाचालकाने तिघा साथीदारांसह तरुणाला लुबाडले; मंगळवार पेठेत चाकूचा धाक दाखवून PhonePe द्वारे घेतले पैसे

by nagesh
Phonepe | now flipkart and phonepe are not one company separate two companies business

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पार्सल आणण्यासाठी पहाटे शहर रिक्षाने जात असताना रिक्षाचालकाने मंगळवार पेठेतील (Mangalwar Peth) रेल्वे पुलाखाली नेऊन चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने मोबाईल, PhonePe द्वारे पैसे घेऊन तरुणाला लुबाडले. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी अनुप शिवहरी शिगोकर (वय १८, रा. ओम सुपर मार्केट, मॉडेल कॉलनी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप हे वडिलांनी पाठवलेले पार्सल आणण्यासाठी संगमवाडी येथे जात होते. त्याच्यासोबत त्याचा रुमपार्टनर रवींद्र मालखेडे याला घेऊन ६ मार्च रोजी पहाटे पावणेसहा वाजता ते जात होते. रिक्षाचालक व त्याच्याबरोबर दोघे जण बसले होते. त्यांनी रिक्षा संगमवाडी येथे न सोडता मंगळवार पेठेतील रेल्वे पुलाखाली नेले. तेथे त्यांनी चाकूचा धाक दाखवून (Pune Crime) दोघांचे २ मोबाईल त्यांच्या खिशातील १ हजार रुपये तसेच फोन पे वरुन १ हजार ८०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याचा मित्र सार्थक याचे मोबाईलमधील फोन पे द्वारे २ हजार रुपये बळजबरीने ट्रान्सफर करुन घेतले. रिक्षामधील दोघांनी त्यांना दगडाचा धाक दाखवून तेथून निघून जाण्यास सांगून २६ हजार ७०० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरुन रिक्षातून पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक शेटे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The rickshaw puller robbed the youth along with three accomplices Money taken by PhonePe at the mangalwar peth

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दुर्दैवी ! दौंड येथील तलावात बुडुन दोघा चुलत भावांसह तिघांचा मृत्यु

Pune Crime | पहाटे रिक्षाचालकाच्या नकाराने झालेल्या वादात दोघा तरुणांवर चाकूने वार; विश्रांतवाडीतील घटनेत रिक्षाचालकासह तिघांवर गुन्हा

Pune Crime | पुण्याच्या हडपसरमध्ये उसने घेतलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तरुणाचे भर दिवसा अपहरण; गुन्हे शाखेकडून 4 तासात पर्दाफाश, 5 जण अटकेत

PM Modi Visit To Pune | Pune Metro चे PM मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; नरेंद्र मोदी म्हणाले – ‘पुण्याच्या विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार’

All India Pharmacist Association Maharashtra | अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्राजक्ता चव्हाण यांची निवड

HSC Board Exam | 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! इंग्रजीच्या पेपरमधील ‘हा’ प्रश्न चुकीचा सोडवला असेल तरीही मिळणार गुण

Best Mutual Fund | मार्केटऐवजी ‘या’ 10 SIP मध्ये अवघ्या 500 रुपयांनी सुरू करा गुंतवणूक आणि मिळवा जबरदस्त रिटर्न

 

Related Posts