IMPIMP

Pune Crime | मार्केटयार्डमधील टेम्पोचालकाला लुटणार्‍या दोघा गुन्हेगारांना अटक

by Team Deccan Express
Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मार्केटयार्डमधून (Market Yard) माल घेऊन जाणार्‍या एका टेम्पोचालकाला (Temp Driver) अडवून त्याला लुटणार्‍या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime)

 

बबलु ऊर्फ कपिल अतुल शिंदे (वय १९) आकाश सुरवसे (वय २५) आणि आवी निंबाळकर (वय २२, सर्व रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. शिंदे आणि सुरवसे यांना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

याबाबत आशिष तुकाराम राठोड (वय २६, रा. कारोळ पो. गहुली, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७३/२२) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड हे भंगार माल घेऊन गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता टेम्पो घेऊन जात होते. यावेळी वखार महामंडळाजवळ आरोपीनी मोटारसायकलवरुन येऊन त्यांची गाडी अडविली. राठोड व त्यांच्या सोबतचे मित्र कुंदन पवार यांना धमकावून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल असा १७ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने हिसकावून घेतले. राठोड यांनी विरोध केल्याने त्यांच्यात झटापट झाली. तेव्हा जमलेल्या लोकांनी त्यांच्यातील एकाला पकडले व पोलिसांच्या हवाली केले.
आकाश सुरवसे याला पोलिसांनी पकडले. निंबाळकर पळून गेला. बबलु शिंदे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
सहायक पोलीस निरीक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | Two criminals arrested for robbing a tempo driver in a market yard pune

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts