IMPIMP

BMC Notice To Rana Couple | राणा दाम्पत्याला BMC कडून अल्टिमेटम; ‘ते’ बांधकाम अनधिकृतच, 7 ते 15 दिवसांत पाडा

by Team Deccan Express
BMC Notice To Rana Couple | brahman mumbai mahanagar palika brahman mumbai municipal corporation has given an ultimatum to mp navneet rana to demolish unauthorized construction in 7 to 15 days

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BMC Notice To Rana Couple | खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांचे खारमध्ये निवासस्थान आहे. त्या निवासस्थानामधील आठव्या मजल्यावर नियमांचा भंग केल्याप्रकरणी महापालिकेने (BMC Notice To Rana Couple) राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्या नोटीसीला त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.

 

महापालिकेने राणा दाम्पत्याच्या बंगल्याची पाहणी केली त्यावेळी निवासस्थानाचा जो अधिकृत आराखडा मंजूर केला होता, त्या व्यतिरिक्त अतिरिक्त बांधकाम झाल्याचे दिसले. हे अधिकचे बांधकाम का केले असा प्रश्नही महापालिकेने राणा दाम्पत्याला विचारला. त्याचरबरोबर हे अनधिकृत बांधकाम 15 दिवसात पाडा अन्यथा महापालिकेला कारवाई करावी लागेल असा इशाराही नोटीसद्वारे (BMC Notice To Rana Couple) देण्यात आला आहे.

 

महापालिकेने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य बांधकामाच्या नियमिततेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर त्यावर महापालिका विचार करेल. मात्र सध्याचे राजकीय चित्र पाहता महापालिकेकडून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच ते दाद मागण्यासाठी न्यायालयात देखील जाऊ शकतात.

 

काही दिवसांपूर्वी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणा यांच्या घराची पाहणी केली होती.
त्यानंतर पालिकेनं आज राणा दाम्पत्याला महापालिका कायद्याच्या कलम 351 (1 A) च्या अंतर्गत कारणे दाखवा नोटीस पाठवली.
त्यावेळी राणा दाम्पत्याकडून ठोस असे कारण न मिळाल्यास अवैध बांधकाम प्रकरणी कारवाई करण्यात येईल असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

 

Web Title :- BMC Notice To Rana Couple | brahman mumbai mahanagar palika brahman mumbai municipal corporation
has given an ultimatum to mp navneet rana to demolish unauthorized construction in 7 to 15 days

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts