IMPIMP

Sangli Crime | गुप्तधन शोधले नाही म्हणून केला तरुणाचा खून; प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइनSangli Crime | सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील (Kavthemahankal Taluka) नागज घाटात (Nagaj Ghat) चार महिन्यापूर्वी अवधूत सोपान शिंदे Avadhut Sopan Shinde (वय-29 रा. धामणी ता. तासगाव Tasgaon) या तरुणाचा खूनाचा (Murder in Sangli) उलगडा झाला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक कारण समोर आले (Sangli Crime) आहे. पैसे घेऊनही गुप्तधन शोधले नाही म्हणून अवधूत शिंदे याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन तिघांना अटक (Arrest) केली आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आनंदराव आत्माराम पाटील (वय-57 रा. पाडळी, ता. तासगाव), तुषार बाळू कुंभार (वय-28 रा. घोटी खुर्द, ता. तासगाव), लखन ठोंबरे (रा. पंचशीलनगर, विटा), वैभव तानाजी सकट, अमोल विठ्ठल कारंडे (दोघे रा. आंबवडे, ता. खटाव जि. सातारा Satara),
आण्णा (संपूर्ण नाव समजू शकले नाही) या सहा जणांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात (Kavthemahankal Police Station)
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंदराव पाटील, तुषार कुंभार व अमोल कारंडे या तिघांना पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात आली आहे. (Sangli Crime)

 

अवधूत शिंदे याचा खून करुन अपघात झाल्याचा बनाव करण्यासाठी त्याचा मृतदेह व दुचाकी नागज घाटात टाकल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
गुप्तधन शोधण्यासाठी आरोपी आनंदराव पाटील यांच्याकडून व इतरांकडून पैसे (Money) व सोने (Gold) घेतले होते.
मात्र, गुप्तधन शोधले नाही आणि पैसेही देत नसल्याच्या कारणावरुन आरोपींनी खून केल्याचे कबूल केले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर 2021 रोजी अवधूत शिंदे याचा मृतदेह नागज घाटात विटा-जत रस्त्यापासून दहा फूट खाली सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
त्याच्या मृतदेहाजवळ दुचाकी पडलेली असल्याने हा अपघात (Accident) असावा, असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
नागजचे पोलीस पाटील दीपक शिंदे (Nagaj Police Patil Deepak Shinde) यांनी या घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली.
पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे (Police Inspector Jitendra Shahane) यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरु केला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान आरोपी आनंदराव पाटील, तुषार कुंभार, लखन ठोंबरे, वैभव सकट, अमोल कारंडे आणि अन्य एकाने अवधूत शिंदे याला 8 ऑक्टोबर रोजी रात्री खटाव तालुक्यातील (Khatav Taluka) आंबवडे (Ambawade) गावच्या माळरानावर नेले.
त्याठिकाणी त्याला काठी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण (Beating) केली.
यामध्ये अवधूतचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी कारमधून त्याचा मृतदेह नागज घाटात नेला.
त्याठिकाणी मृतदेह टाकून त्याची बुलेट दुचाकी टाकून देऊन अपघाताचा बनाव रचला.

 

पोलिसांनी तपास करुन चार महिन्यांनी या खुनाचा उलगडा करत संशयित तिघांना अटक केली असून इतर तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे (LCB) सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार (API Prashant Nishandar), शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Sangli Crime | Murder of a young man as no secret treasure was found Huge excitement in sangli district

 

हे देखील वाचा :

Munmun Dutta | तारक मेहतामधील ‘बबीता’ची 4 तासांच्या चौकशीनंतर जामीनावर सुटका? अखेर चर्चांवर बबिताने सोडलं मौन

Multibagger Stocks | ‘या’ 5 शेयरने एक महिन्यात भरली गुंतवणुकदारांची झोळी, तुमच्याकडे सुद्धा असावेत ‘हे’ स्टॉक्स; जाणून घ्या

Parambir Singh | अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे परमबीर सिंह यांचं निलंबन रद्द होणार?

 

Related Posts