IMPIMP

Munmun Dutta | तारक मेहतामधील ‘बबीता’ची 4 तासांच्या चौकशीनंतर जामीनावर सुटका? अखेर चर्चांवर बबिताने सोडलं मौन

by nagesh
Munmun Dutta | Babita in Tarak Mehta released on bail after 4 hours of interrogation? Babita finally broke the silence on the discussions

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनछोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम बबीता (Babita) म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिच्या अटकेविषयी (Arrest) जोरदार चर्चा सुरु आहे. एका विशिष्ट समजावार टिप्पणी केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर चार तासांच्या चौकशीनंतर तिची अंतरिम जामीनावर सुटका (Release on Interim Bail) करण्यात आल्याचे म्हटले जात होते. मात्र या सर्व चर्चांवर मुनमुन दत्ताने (Munmun Dutta) स्पष्टीकरण दिलं आहे. इतकंच नाही तर अटकेचं वृत्तही तिने फेटाळून लावलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नेमकं सत्य काय?

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) मुनमुन दत्ताला (Munmun Dutta) अटक झाली अशी जोरदार चर्चा सुरु होती. या चर्चांवर अखेर मुनमुन दत्ताने आपलं मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत तिने सत्य सांगितले आहे, मला अटक करण्यात आली नव्हती. केवळ नॉर्मल चौकशीसाठी (Inquiry) मला बोलावण्यात आलं होतं. शुक्रवारी मला अंतरिम जामीन मंजूर झाला. पण त्यावेळी मला केवळ सर्वसाधारण चौकशीसाठी पोलिसांसोबत जावं लागलं होतं.

 

मला अटक झाली नाही

मुनमुन दत्ताने सांगितले की, मला अटक झालीच नव्हती. उलट मी शुक्रवारी ज्यावेळी कोर्टात गेले होते त्यावेळी चौकशीसाठी जाण्यापूर्वी मला अंतरिम जामीन मंजूर झाला होता. हंसी पोलीस स्टेशनच्या (Hansi Police Station) पोलिसांनी जवळपास अडीच तास माझी चौकशी केली आणि या प्रकरणाशी संबंधित माहिती माझ्याकडून घेतली. यावेळी पोलीस चौकशीमध्ये प्रत्येकजण माझ्याशी नम्रपणे आणि व्यवस्थित वागले.

 

काही जणांनी अफवा पसरवली

चौकशीदरम्यान, पोलिसांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर दिलं तसेच यापुढेही तपासात माझी गरज भासल्यास मी पोलिसांना सहकार्य करेन. पण या प्रकरणी ज्या प्रकारे चर्चा झाली ते पाहून मला खूप वाईट वाटलं. अनेकांनी चुकीच्या हेडिंग्सने बातम्या (News) केल्या. क्लिकबेट हेडिंग (Clickbet Headings) आणि फोटोचा वापर करुन अफवा पसरवली याचं मला खूप वाईट वाटलं. असेही मुनमुन दत्ताने सांगितले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नेमकं काय आहे प्रकरण?

मुनमुन दत्ताने 9 जानेवारी 2021 रोजी युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला होता.
यामध्ये तिने अनुसूचित जातींविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.
याप्रकरणी हरियाणातील (Haryana) हांसी येथील दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन (Rajat Kalsan)
यांनी मुनमुनविरुद्ध हांसी पोलीस ठाण्यात एससी एसटी अॅक्ट (SC ST ACT) अंतर्गत तक्रार दिली होती.

 

Web Title :- Munmun Dutta | Babita in Tarak Mehta released on bail after 4 hours of interrogation? Babita finally broke the silence on the discussions

 

हे देखील वाचा :

Multibagger Stocks | ‘या’ 5 शेयरने एक महिन्यात भरली गुंतवणुकदारांची झोळी, तुमच्याकडे सुद्धा असावेत ‘हे’ स्टॉक्स; जाणून घ्या

Parambir Singh | अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे परमबीर सिंह यांचं निलंबन रद्द होणार?

Pune Crime | 3 सराईत गुन्हेगारांना अटक, अलंकार पोलिसांकडून वाहनचोरीचे 11 गुन्हे उघडकीस

 

Related Posts