IMPIMP

Satara Crime | लग्नाच्या चौथ्याच दिवशी तरुणानं शोले स्टाईलनं आंदोलन करत केला आत्महत्येचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime | young man attempts suicide climbing electric dp hinjawadi incident pune

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन  Satara Crime | एका तरुणांन लग्नाच्या चौथ्याच दिवशी सातारा नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन करत आत्महत्येचा प्रयत्न करत केल्याची विचित्र घटना समोर आली आहे वेळीच पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्याने तरुणाचा जीव वाचवणं शक्य झालं आहे. बराच काळ समजावून सांगितल्यानंतर तरुणाला खाली उतरवण्यात आलं आहे. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी (Satara Crime) केली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

संबंधित तरुण हा सातारा शहरातील गुरुवार पेठ (Guruwar Peth, Satara) परिसरात वास्तव्याला असून लग्नाच्या चौथ्याच दिवशी तरुणानं असं टोकाचं पाऊल उचलल्यानं गावात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कौटुंबीक वादातून मानसिक ताण निर्माण झाल्यानं तरुण पाण्याच्या टाकीवर चढला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला, पोलिसांनी या तरुणाची समजूत काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

 

दरम्यान या घटनेची माहिती परिसरात वाऱ्याच्या वेगात पसरली होती. त्यामुळे रविवारी दिवसभर
सर्वत्र याच घटनेची चर्चा होती. तुर्तास पोलिसांनी समुपदेशन करत तरुणाला मानसिक आधार दिला
आहे. तसेच आत्महत्या न करण्याचा सल्ला दिला आहे.

 

Web Title : Satara Crime | after 4 days of marriage man attempt to suicide by climbing on water tank in satara

 

हे देखील वाचा :

Pune News | कोरोना नियमाचे उल्लंघन ! पुणे जि. प. माजी अध्यक्षांसह कार्यालयाच्या मालकावर गुन्हा

Shivsena MP Bhavana Gavali | ईडीचा दणका ! शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर ED चा छापा

CBSE ने बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये केला मोठा बदल, यावर्षी दोन टप्प्यात होईल परीक्षा

 

Related Posts