IMPIMP

CBSE ने बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये केला मोठा बदल, यावर्षी दोन टप्प्यात होईल परीक्षा

by nagesh
CBSE 12th Result | CBSE 12th Result Declared; See the result

देहरादून : वृत्तसंस्था CBSE | कोरोना काळ पाहता शिक्षण प्रणालीत सतत बदल होत आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे बोर्ड परीक्षा सुद्धा रद्द करावी लागली होती. यावर्षी अशी परिस्थिती टाळण्यासाठी सीबीएसईने परीक्षा पॅटर्नमध्ये मोठा बदल केला आहे (CBSE has made major changes in the examination pattern). व्यावसायिक अभ्यासक्रमाप्रमाणे या सत्रात बोर्डाच्या वर्गांसाठी दोन टप्प्यात परीक्षा होईल (two-stage examination for board classes). नवीन पॅटर्न (new pattern) च्या हिशोबाने शाळांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यास सुरूवात केली आहे.

टर्म वन परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न

सीबीएसईच्या टर्म वन परीक्षेमध्ये बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 90 मिनिटांचा वेळ दिला जाईल.
अंदाज वर्तवला जात आहे की, स्पर्धा परीक्षांप्रमाणे प्रश्नपत्रिकेत 50 ते 60 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दिड मिनिटाचा वेळ असेल.

मासिक परीक्षांचा पॅटर्न सुद्धा तयार

दून इंटरनॅशनल स्कूलचे मुख्य प्राचार्य दिनेश बर्थवाल (Dinesh Berthawal, principal of Doon International School) यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षांप्रमाणेच विद्यार्थ्यांना वेळेच्या नियोजनासह बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यास शिकवले जात आहे. मासिक परीक्षांचा पॅटर्न सुद्धा हे लक्षात घेऊन तयार केला गेला आहे.

 टर्म टू परीक्षा जुन्या पॅटर्नवरच

तर टर्म टू परीक्षा जुन्या पॅटर्नवरच होईल, परंतु परीक्षेसाठी तीन तासांऐवजी दोन तासांचा वेळ दिला जाईल. दोन्ही टर्म परीक्षांमधून 50-50 टक्के गुण दिले जाणार आहेत. नवीन पॅटर्नकडे नवीन शिक्षण धोरण 2020 च्या दृष्टीने सुद्धा पाहिले जात आहे. शिक्षण मंत्रालय यावर्षी या पॅटर्नकडे ट्रायल म्हणून देखील पहात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शाळांना असेल परीक्षा घेण्याची सवलत

सीबीएसईच्या टर्म वनची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये प्रस्तावित आहे. परीक्षेच्या आयोजनासाठी एक महिन्यासाठी विंडो उघडली जाईल. शाळांना आपल्या भागातील परिस्थिती आणि कोरोना संसर्गाची स्थिती पाहाता परीक्षा कार्यक्रम ठरवण्याची सूट असेल.

लेखी परीक्षेत दिर्घ उत्तरांचेच प्रश्न

प्रयोगात्मक विषयांसाठी ठरलेल्या पूर्णांकाच्या 50 टक्के टर्म वनमध्ये अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारवर निर्धारित असेल. तर टर्म टूमध्ये प्रयोगात्मक विषयांसाठी जुन्या पॅटर्नप्रमाणेच परीक्षक बोर्ड नियुक्त करेल आणि लेखी परीक्षेत दिर्घ उत्तरांचेच प्रश्न विचारले जातील.

परीक्षेत सहभागी न होणार्‍यांचे नुकसान

सिद्धार्थ पब्लिक स्कूलचे संचालक सुरेश डंडरियाल यांनी म्हटले की, नवीन परीक्षा पॅटर्न समजून
घेण्यासाठी विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि शाळा आणि शिक्षकांच्या संपर्कात
राहावे लागेल. अभ्यास आणि परीक्षेपासून जे विद्यार्थी दूर आहेत, त्यांचे नुकसान होऊ शकते.

 

Web Title : cbse made a big change in the exam pattern

 

हे देखील वाचा :

Upcoming IPOs | सप्टेंबरमध्ये येताहेत आणखी 2 कमाईच्या संधी, जाणून घ्या किती रुपयांची करावी लागेल गुंतवणूक?

Earn Money | केवळ एक एकरच्या शेतीत 6 लाख रुपयांची करा कमाई, सरकार सुद्धा करेल मदत; जाणून घ्या

Modi Government | सरकारने दिला मोठा दिलासा ! TAX संबंधित या सर्व कामकाजाची वाढवली तारीख, जाणून घ्या नवीन कालावधी

 

Related Posts