IMPIMP

Shraddha Walker Murder Case | श्रद्धाच्या पत्रावर पोलिसांनी कारवाई का केली नाही? देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

by nagesh
Shraddha Walker Murder Case | shraddha walker murder case deputy cm of the state devendra fadnavis has also said that the letter written by shraddha is serious

सरकारसत्ता ऑनलाईन Shraddha Walker Murder Case | वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर या तरूणीचे आफताब पूनावाला या तरूणाशी प्रेमसंबंध होते. दोघेही दिल्लीत राहत होते. या तरूणीची पूनावाला याने निर्घूण हत्या केली होती. पण श्रद्धाने तिच्यावर होणाऱ्या छळाची कबुली एका पत्रात दिली होती. तिने हे पत्र तिच्या मृत्युपूर्वी लिहिले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धाने लिहिलेले पत्र गंभीर आहे. मी ते पत्र वाचले आहे आणि चौकशीचे आदेश दिले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. (Shraddha Walker Murder Case)

 

श्रद्धा आणि आफताब लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यांची लग्नावरून अनेकवेळा भांडणे होत होती. त्यातून एक दिवस आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे जंगलात फेकून दिले. आफताब मुंबईतून बेपत्ता असल्याची तक्रार वसई पोलिसांना मिळाली आणि आफताबचा आणि त्याने केलेल्या कृत्याचा शोध लागला. यावेळी आपण रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचे त्याने कबूल केले आहे. न्यायालयाने आफताबची नार्को चाचणी करण्यास देखील परवानगी दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

श्रद्धाने आफताबच्या त्रासाबद्दल 23 नोव्हेंबर 2020 रोजी नालासोपारातील तुळींज पोलिसांत एक तक्रार केली होती.
मात्र 19 डिसेंबरला श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली. आफताबने तिला आत्महत्येची धमकी दिली होती.
पोलिसांनी त्यावेळी कोणतीही कारवाई केली नव्हती. पोलिसांनी त्यावेळी तात्काळ कोणती कारवाई केली असती,
तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता. त्यामुळे श्रद्धाने पत्र देऊनही कारवाई का झाली नाही,
असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

Web Title :- Shraddha Walker Murder Case | shraddha walker murder case deputy cm of the state devendra fadnavis has also said that the letter written by shraddha is serious

 

हे देखील वाचा :

Rakhi Sawant | राखी सावंतने टॉयलेटमधील व्हिडीओ केला शेअर

Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी

Sanjay Raut On Raosaheb Danve | ‘केंद्रीय मंत्री असल्याने माहिती त्यांच्यापर्यंत गेली असावी’; संजय राऊतांचा रावसाहेब दानवेंना टोला

 

Related Posts