IMPIMP

Solapur Crime | पुण्यातील ‘विवाहित’ प्रेमी युगुलाची सोलापूर जिल्ह्यातील लॉजवर आत्महत्या; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
 Pune Crime News | Husband's threat to wife's lover, extreme step taken by lover...; Incidents in Loni Kalbhor area

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Solapur Crime | लोणीकंद (जि. पुणे) येथील प्रेमी युगुलाने लांबोटी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील एका लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी रात्री घडली (Solapur Crime) असून  धनंजय बाळू गायकवाड व अश्विनी बिराप्पा पुजारी अशी मृतांची नावे आहेत. दोघांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही.  या बाबतची नोंद  मोहोळ पोलिसांत (Mohol Police) झाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनंजय गायकवाड व अश्विनी पुजारी यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही विवाहित असल्याने त्यांच्या प्रेम संबंधाला घरच्यांचा विरोध होता. सोलापुरातील (Solapur Crime) निराळे वस्ती येथील एका तरुणाबरोबर अश्विनीचा विवाह झाला होता. ती काही दिवसांपूर्वी माहेरी लोणीकंद येथे गेली होती. सोमवारी रात्री धनंजय आणि आश्विनी गुपचूप सोलापूरकडे निघाले होते. रात्री उशीर झाल्याने त्यांनी १० वाजण्याच्या सुमारास लांबोटी गावच्या शिवारातील एका लॉजवर मुक्काम केला होता. त्यानंतर त्यांनी  लॉज मालकाला जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी वेटरला पाठवून द्या, असे सांगितले होते.वेटर ज्यावेळी त्यांच्या रूमबाहेर जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी पोहोचला त्यावेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने खिडकीतून आत पाहिले असता दोघांनीही गळफास घेतल्याचे दिसले. लॉजच्या मालकाने तात्काळ याबाबत मोहोळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता धनंजय गायकवाड याने ओढणीने, तर अश्विनी पुजारी हिने दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. पुढील तपास सहाय्यक फौजदार युसूफ शेख करीत आहेत.

 

Web Title : Solapur Crime | Pune’s couple suicide in mohol of solapur district

 

हे देखील वाचा :

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

World Heart Day 2021 | जास्त घाम, पायांमध्ये सूज, हृदय विकाराच्या झटक्याचे ‘हे’ 9 संकेत; जाणून घ्या

Men’s Health | पुरुषांनी कधीही दुर्लक्ष करू नये या 5 लक्षणांकडे, आरोग्यासाठी धोका, जाणून घ्या

 

Related Posts