IMPIMP

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

by nagesh
BJP-MNS Alliance | bjp mns might make alliance pune nashik thane kalyan dombivali municipal election

मुंबई : वृत्तसंस्थाराज्यात भाजप शिवसेना युती (BJP-Shivsena Alliance) तुटल्यानंतर भाजपला राज्यात नव्या मित्राची गरज आहे. यातच भाजप-मनसे युतीबाबत (BJP-MNS Alliance) मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज (Krishnakunj) निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे भाजप-मनसे युती (BJP-MNS Alliance) होणार या चर्चांनी आणखीनच जोर धरला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पालघर जिल्हा परिषद (Palghar Zilla Parishad), पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत (Panchayat Samiti by-election) भाजप-मनसेची युती पहायला (BJP-MNS Alliance)
मिळणार आहे. भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील (Nandkumar Patil) यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. यानंतर आता आणखी चार निवडणुकांमध्ये भाजप-मनसे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. पुणे (Pune), नाशिक (Nashik), ठाणे (Thane) आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत (Kalyan-Dombivali Municipal Corporation elections) हे दोन पक्ष युती करण्याची शक्यता आहे. तसा आग्रह दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

 भाजपची युती फायद्याची

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी भाजपसोबत युती करण्याचा आग्रह धरला आहे. भाजपसोबत युती झाली तर मनसेला याचा मोठा फायदा होईल, असं वक्तव्य पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी केले. भाजपने हात पुढे केला तर मनसेही हात पुढे करेल असे वसंत मोरे यांनी म्हटले. पुण्यात भाजपची एकहाती सत्ता आहे. परंतु राज्यात भाजप सत्तेत नसल्याने याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना देखील आता भाजपच्या सोबतीला नाही. त्यामुळे भाजप मनसेसोबत युती करु शकते.

या ठिकाणी युती होऊ शकते

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नाशिकमध्ये भाजप-मनसे युती होऊ शकते. मागील काही महिन्यांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे सतत नाशिक दौरा करत आहेत. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनही यामध्ये लक्ष घातले आहे. नाशिक महापालिकेत 2012 मध्ये मनसेची सत्ता होती. परंतु त्यानंतर 2017 मध्ये भाजपने मनसेकडून सत्ता खेचून घेतली. आजही नाशिकमध्ये मनसेची ताकद आहे. सध्या युती संदर्भात दोन्ही पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. बंद दाराआड बैठका होत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अशी आहे दोन्ही पक्षांची ताकद

कल्याण-डोंबिवली मध्ये भाजपचे 2 तर मनसेचा 1 आमदार आहे.
या भागात मनसेची ताकद आहे. केडीएमसीमध्ये शिवसेना पहिल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.
भाजपला मनसेची साथ मिळाली तर शिवसेनेला ही निवडणूक जड जाऊ शकते.
त्यामुळेच भाजप-मनसे युतीचा आग्रह कार्यकर्त्यांनी लावून धरला आहे.
जर या दोन पक्षात युती झाली तर शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.

 

Web Title : BJP-MNS Alliance | bjp mns might make alliance pune nashik thane kalyan dombivali municipal election

 

हे देखील वाचा :

World Heart Day 2021 | जास्त घाम, पायांमध्ये सूज, हृदय विकाराच्या झटक्याचे ‘हे’ 9 संकेत; जाणून घ्या

Men’s Health | पुरुषांनी कधीही दुर्लक्ष करू नये या 5 लक्षणांकडे, आरोग्यासाठी धोका, जाणून घ्या

Gold Price Today | जारी झाले सोने-चांदीचे दर, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

 

Related Posts