IMPIMP

Men’s Health | पुरुषांनी कधीही दुर्लक्ष करू नये या 5 लक्षणांकडे, आरोग्यासाठी धोका, जाणून घ्या

by nagesh
Men’s Health | men health signs symptoms men regularly ignore can be fatal doctor

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Men’s Health | बहुतांश पुरुष छोट्या-मोठ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. तसेच डॉक्टरांकडे जाणे टाळतात. मात्र, कधी-कधी हीच सामान्य लक्षणे गंभीर आजारात बदलतात, तेव्हा जीवघेणी सुद्धा ठरू शकतात. पुरुषांनी कोणत्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये ते जाणून घेवूयात. (Men’s Health)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

1. लघवीची समस्या –

लघवीला अडचण येणे किंवा वेदना जाणवणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नये. पन्नाशीच्या पुरूषांमध्ये ही लक्षण जास्त दिसतात. अशावेळी डॉक्टरांकडे जा.

2. शरीरावरील तिळामध्ये बदल –

तिळ किंवा मस यामुळे त्वचेचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. बहुतांश लोकांना यामध्ये झालेले बदल समजत नाहीत. तिळ किंवा मसचा आकार, रंग बदलल्यास डॉक्टरांकडे जा.

3. असामान्य गाठ –

जर तुमच्या प्रायव्हेट पार्टवर एखादी गाठ येत असेल तर याकडे लक्ष द्या. हे सुद्धा एकप्रकारचा कॅन्सरचे लक्षण आहे.
टेस्टीक्युलर कॅन्सर सामान्यपणे 15 ते 49 वर्षाच्या पुरूषांना होतो. वेदना, आकारात बदल झाल्यास डॉक्टरांकडे जा.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

4. छातीत वेदना –

छातीत सतत वेदना होत असतील तर डॉक्टरांकडे जा. हा सुद्धा पोट किंवा घशाचा कॅन्सर, हृदयरोग किंवा हार्ट फेलचा संकेत असू शकतो.
छातीत होणार्‍या वेदनेच्या पॅटर्नकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

5. मूड आणि पर्सनालिटीमध्ये बदल –

मूडमध्ये बदल होणे डिप्रेशनचा सुद्धा संकेत आहे. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. यापाठीमागे इतरही कारणे असू शकतात.

 

Web Title : Men’s Health | men health signs symptoms men regularly ignore can be fatal doctor

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | जारी झाले सोने-चांदीचे दर, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

Kolhapur Anti Corruption | लाच घेताना पोलिसासह दोन पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts