IMPIMP

Solapur Crime | सीना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तरुण डॉक्टराचा बुडून मृत्यू

by nagesh
Pune Crime | Young woman dies after tripping in mine; The incident at Katraj, a case has been registered against both

माढा : सरकारसत्ता ऑनलाइन Solapur Crime | सीना नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पुण्यातील (Pune) एका डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू (Sina River Drowning Doctor Death) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोलापूर जिल्यातील (Solapur Crime) माढा (Madha) तालुक्यातील रिधोरे (Ridhore) येथील सीना नदीच्या बंधाऱ्याजवळ घडली आहे. डॉ. रेहन आरिफ सय्यद Dr. Rehan Arif sayed (वय-26 रा. इंदापूर, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुण डॉक्टरचे नाव आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

डॉ. रेहान सय्यद हे त्यांच्या वडिलांचे मित्र संजय सरोदे Sanjay Sarode (रा. म्हैसगाव, ता. माढा) यांच्या शेतात सुट्टीसाठी आले होते. दुपारच्या सुमारास उष्णता वाढू लागल्याने डॉ. रेहान हे अमन सय्यद व जिब्रान सय्यद यांच्यासोबत सीना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले. पोहण्याचा आनंद घेत असताना त्यांना आपण बंधाऱ्याच्या दाराजवळ आल्याचे समजले नाही. डॉ. रेहान हे दमल्यामुळे त्यांना काठावर येता आले नाही. (Solapur Crime)

डॉ. रेहान यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनी त्यांना बेशुद्धवस्थेतच नदी पात्राबाहेर काढले. त्यांना तातडीने कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital Kurduwadi) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. डॉ. रेहान हे पुणे येथील महाविद्यालयात एमबीबीएसचे (MBBS) शिक्षण झाले आहे. सध्या ते सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital Solapur) प्रॅक्टिस करत होते. अवेज जलील मौलानी (रा. इंदापूर) यांच्या खबरीवरुन कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात (Kurduwadi Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- Solapur Crime | sina river drowning pune doctor death rehan sayyed died crime news

हे देखील वाचा :

Mumbai Crime | महिलेने पोटात लपवल्या ड्रग्जनं भरलेल्या तब्बल 20 कॅप्सूल, पोलिसही चक्रावले

Kiara Advani Oops Moment | ढगळ्या कपड्यांनी कियाराला सगळ्यांसमोर दिला धोका, फॅशनच्या नादात झाली Oops Moment ची शिकार..

Anti Corruption Bureau (ACB) Sangli | वेतनश्रेणीच्या मान्यतेसाठी मागितले दीड लाख; शिक्षणाधिकाऱ्यासह अधिक्षकाला रंगेहाथ पकडले

Related Posts