IMPIMP

Pune Velhe Budruk Crime | पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, संतप्त नातेवाईकांनी मृतदेह नेला पोलीस ठाण्यात

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Velhe Budruk Crime | (Rajgad) तालुक्यातील वेल्हे बुद्रुक येथे एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे (Married Woman Suicide Case). करिष्मा आकाश राऊत (वय-24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी मयत करिष्माचा मृतदेह अॅम्ब्युलन्ससह वेल्हे पोलीस ठाण्याच्या आवारात नेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे पोलीस स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबत मयत करिष्मा हीचे वडील शंकर नारायण शेडगे (वय 54 रा. धामनओहळ, ता. मुळशी. सध्या रा. धायरी गाव, पुणे) यांनी बुधवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. या प्रकरणात वेल्हे पोलिसांनी पती आकाश राऊत, सासू आशा राऊत, सासरे जयराम राऊत या तिघांवर गुन्हा दाखल केला असून पती आकाश राऊत यास अटक केली असल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, फिर्य़ादी शंकर शेडगे यांची लहान मुलगी मयत करिष्मा आणि आकाश राऊत यांचा 22 फेब्रुवारी 2022 रोजी विवाह झाला. लग्नानंतर पाच महिने सुरळीत चालले होते. त्यानंतर पती आकाशने तसेच सासरे जयराम आणि सासू आशा राऊत यांनी करिष्माला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच माहेरच्यांशी फोनवर बोलण्यास बंदी घातली. फोनवर बोलणे होत नसल्याने फिर्यादी हे वेल्हे बुद्रुक येथील घरी करिष्माला भेटण्यासाठी गेले. त्यावेळी आकाशने तुम्ही तिला भेटायला यायचे नाही असे सांगितले.

यानंतर करिष्माने पुढील काही महिने दबावाखाली काढले. त्यानंतर करिष्मा गरोदर राहिली. शेडगे यांनी अनेक वेळा राऊत कुटुंबीयांना करिष्माचे डोहाळे जेवण घालण्यासाठी तिला घरी पाठवण्याची विनवणी केली. मात्र, सासरच्या लोकांनी त्यास नकार दिला आणि प्रसुती होण्याच्या तीन ते चार दिवस आगोदर करिष्माला माहेरी पाठवलं.

26 जून 2023 रोजी करिष्माला मुलगी झाली. बाळंत झाल्याच्या पाचव्या दिवशी आकाशने शेडगे यांना फोन करुन करिश्माला आहे त्या अवस्थेत सासरी पाठवून देण्यास सांगितले. तिची सध्या उठ-बस करण्याची परिस्थिती नसल्याने तिला महिना-पंधरा दिवस माहेरी राहू द्या असे शेडगे यांनी म्हटल्याने आकाशने त्यांच्यासोबत फोनवर शाब्दिक वाद घातला. त्यानंतर नाईलाजास्तव शेडगे यांनी करिष्माला सासरी सोडले.

त्यानंतरही सासरच्या लोकांनी तिचा छळ करणे थांबवले नाही. अखेर सासरच्या छळाला कंटाळून करिष्माने 31 मार्च रोजी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी (दि.2) उपचारादरम्यन रात्री आठ वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ (API Nitin Khamgal) करीत आहेत.

Unmesh Patil BJP – Shivsena UBT | जळगाव: भाजपचे खासदार उन्मेष पाटील ‘उबाठा’मध्ये जाणार

Related Posts