IMPIMP

आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !

by bali123
after deepika padukone and kriti sanon kareena kapoor will now be sita

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस करिना कपूर ( kareena kapoor ) आणि तिचा पती अ‍ॅक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी नवा पाहुणा आला आहे. सैफ आणि करिना दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत. तैमुर अली खानला (Taimur Ali Khan) भाऊ भेटला आहे. आता करिनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आलेल्या सीतेच्या सिनेमात सीतेच्या रोलसाठी अ‍ॅक्ट्रेस करिना कपूर kareena kapoor हिचं नाव निश्चित केलं आहे, अशी माहिती समोर आली आहे.

अलौकीक देसाई यानं काही दिवसांपूर्वीच सीता द इनकार्नेश या सिनेमाची घोषणा केली होती. या सोबतच सीतेच्या रोलसाठी अ‍ॅक्ट्रेसचा शोध घेण्यासाठी सुरुवात झाली. एका रिपोर्टनुसार आता सीतेच्या रोलसाठी करिना कपूरचं नाव निश्चित झालं आहे. परंतु याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जर करिना या भूमिकेसाठी नाही म्हणाली तर ही भूमिका अ‍ॅक्ट्रेस आलिया भट हिला मिळू शकते असंही समजत आहे.

‘निर्मात्यांची पहिली पसंती ही करिना कपूरला आहे’
अलौकीक देसाईनं एका वेबसाइट सोबत बोलताना सांगितलं की, मला आणि केवी विजयेंद्र प्रसादला वाटतं की, करिना सीतेच्या रोलसाठी अगदी योग्य आहे. निर्मात्यांना वाटत आहे की, त्यांचा हा सिनेमा सीतेच्या दृष्टिकोनातून बनवला जाणार आहे. त्यामुळं रामायणावर आधारित असणाऱ्या सिनेमांपेक्षा हा वेगळा असणार आहे. इतकंच नाही तर या सिनेमासाठी आलिया भटच्या नावाचाही विचार केला होता. परंतु निर्मात्यांची पहिली पसंती ही करिना कपूरला आहे. यासाठी तिला अप्रोच केल्याचंही तो म्हणाला आहे.

‘जर करिनासोबत सारं जुळून आलं नाही तर दुसरी चॉइस आलिया भट आहे’
अलौकीक देसाईनं पुढं बोलताना सांगितलं की, करिनालादेखील सिनेमाची कन्सेप्ट आवडली आहे. कारण सिनेमात तिला रामायणावर आधारित इतर सिनेमांपेक्षा जास्त स्क्रीन टाइम मिळणार आहे. यात तिची प्रमुख भूमिका आहे. सध्या करिनाची टीम शूटिंगसाठी तिच्या डेट्स आणि फिसवर काम करत आहे. जेव्हा साऱ्या फॉर्मेलिटीज पूर्ण होतील तेव्हा अधिकृत जाहीर केलं जाईल. जर करिनासोबत सारं जुळून आलं नाही, तर दुसरी चॉइस आलिया भट आहे असंही तो म्हणाला. केवी विजयेंद्र सुपरहिट सिनेमा बाहुबलीचे लेखक आहेत.

दीपिका पादुकोण, क्रिती सेननदेखील साकारणार सीतेचा रोल
आदिपुरुष या ओम राऊत यांच्या सिनेमा क्रिती सेनन सीतेच्या रोलमध्ये दिसणार आहे, तर मधू मंटेना यांच्या रामायण थ्रीडीमध्येही दीपिका पादुकोण सीतेची भूमिका साकारू शकते. यानंतर आता करिनाही सीतेचा रोल साकारत असल्याचं समजत आहे.

PM मोदींच्या जीवनावर पुन्हा बनणार बायोपिक; ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली’, सचिन वाझेंच्या WhatsApp Status ने खळबळ

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे पुणे, नाशिक विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश; म्हणाले – ‘निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करा

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! हुंड्यासाठी दबाव म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे नाही

Related Posts