IMPIMP

Amruta Subhash | अमृता सुभाषने बॉलिवूडमधील टाइपकास्ट वर केलेले ‘ते’ वक्त्यव्य चर्चेत; “ओटीटीमुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या…”

by nagesh
Amruta Subhash | people warned amruta subhash when she played ranveer singhs mother in gully boy

सरकारसत्ता ऑनलाईन  – गली बॉय या चित्रपटातील रणबीर कपूरची आई ही भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) ही आजही अनेकांना आठवते. अमृताने तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेकांची मन जिंकली आहेत. अमृता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. ती अनेकदा चित्रपट, कलाकार आणि तिच्या वैयक्तिक आयुष्या बद्दल ही बोलत असते. अमृताला (Amruta Subhash) तिच्या स्पष्ट वक्तेपणामुळे देखील ओळखले जाते. अमृताने नुकताच गली बॉय या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल भाष्य केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमृताने ज्यावेळी गली बॉय या चित्रपटात रणवीरच्या आईची भूमिका साकारणार होती त्यावेळी तिला अनेकांनी ही भूमिका साकारू नकोस असा सल्ला दिला होता. कारण त्यांच्या मते ती तिच्याच वयाच्या असणाऱ्या अभिनेत्याच्या आईची भूमिका साकारत आहे. अमृताने असे केले तर येणाऱ्या काळात ती बॉलीवूड मध्ये टाइपकास्ट होण्याची शक्यता आहे. मात्र अमृताने याकडे लक्ष न देता ही भूमिका साकारली होती.

 

 

या भूमिकेबद्दल बोलताना अमृता (Amruta Subhash) म्हणाली, “जेव्हा मी गली बॉय या चित्रपटात रणवीरच्या
आईची म्हणजेच रजिया अहमदची भूमिका साकारणार तेव्हा अनेकांनी मला ही भूमिका साकारू नकोस असा
सल्ला दिला होता. तू तुझ्या वयाच्या अभिनेत्याच्या आईची भूमिका साकारत आहे असे त्यांचे म्हणणे होते.
त्यावेळी ओटीटी हे प्लेटफॉर्म नव्हते, आता ओटीटीमुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.
त्या पात्रा नंतर मी एक बार डान्सरची भूमिका देखील साकारली आहे.
अमृताने दीप्ती नवल यांच्या मुलाखतीची
देखील आठवण करून दिली. तिनी देखील सुरुवातीला असेच पात्र साकारले आणि नंतर ती बॉलिवूडमध्ये
टाइपकास्ट बनत गेली. दीपिकाला टाइपकास्ट बनायचे नव्हते, मात्र तिच्यासमोर कोणतेही पर्याय नसल्यामुळे तिने
ते जवळ केले”. सध्या अमृताचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट देखील केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Amruta Subhash | people warned amruta subhash when she played ranveer singhs mother in gully boy

 

हे देखील वाचा :

Subramanian Swamy | ‘… तर देवेंद्र फडणवीसांची खूर्ची जाईल’; पंढरपूर कॉरिडॉरवरून सुब्रम्हण्यम स्वामींचा इशारा

Subramanian Swamy | ‘… तर देवेंद्र फडणवीसांची खूर्ची जाईल’; पंढरपूर कॉरिडॉरवरून सुब्रम्हण्यम स्वामींचा इशारा

Sanjay Gaikwad | ‘50 खोक्यांची चौकशी करा’ या राऊतांच्या मागणीला संजय गायकवाड यांचे प्रत्युत्तर

MNS | जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने खोटे शिक्के तयार केले आणि बानवट सही केली; मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा

 

Related Posts