IMPIMP

Subramanian Swamy | ‘… तर देवेंद्र फडणवीसांची खूर्ची जाईल’; पंढरपूर कॉरिडॉरवरून सुब्रम्हण्यम स्वामींचा इशारा

by nagesh
Subramanian Swamy | devendra fadnavis will lose deputy cm post says subramanian swamy over pandharpur corridor issue

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाईन   Subramanian Swamy | विठ्ठल मंदिर पंढरपूर येथे मंदिर परिसरात कॉरिडॉर निर्मितीवरून राजकीय पक्षांत आखाडा रंगला आहे. पंढरपूर कॉरिडॉर निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनाने 2030 कोटी 70 लाखांचा विकास आराखडा तयार केला आहे. पण, पंढरपूर कॉरिडॉर रद्द करावा, यासाठी पंढरपुरात स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय आंदोलन सुरू झाले आहे. हा कॉरिडॉर (Pandharpur Corridor) रद्द न झाल्यास स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सामुहीक राजीनामे देण्याची घोषणा केली आहे. काहीजण कॉरिडॉरच्या मुद्यावर पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची आणि पुढच्या वर्षी आषाढी यात्रेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी आमंत्रित करण्याची भाषा बोलत आहेत. त्यामुळे आगामी काळात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. (Subramanian Swamy)

 

एवढे वादळ उठले असताना देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र कॉरिडॉरच्या मुद्यावर ठाम आहेत. मात्र, त्यांनी हा हट्ट सोडला नाही, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खूर्ची देखील जाईल, असा इशारा भाजपचे माजी खासदार सुब्रम्हण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी दिला आहे. स्वामी म्हणाले, मी आव्हान देऊन सांगतो, की पंढरपूर कॉरिडॉर होणार नाही. आणि तो (देवेंद्र फडणवीस) जास्त बोलला, तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही. स्वामींनी स्थानिक जनता आणि राजकारण्यांसह या कॉरिडॉरला विरोध करताना या कॉरिडॉरऐवजी पंढरपूरमधील इतर कामांना आणि विकासाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवेंद्र फडणवीसांना कॉरिडॉरची घाई का झाली आहे, कळत नाही.
चंद्रभागा नदी स्वच्छ करा, येथे एक विमानतळ बांधा.
या ठिकाणी अनेकांना यायचे असते, महाआरतीत सहभागी व्हायचे असते, त्यांना धूळ मातीत यावे लागते.
त्यामुळे आधी पायाभूत सुविधा करा. सर्व काही छान होईल. नंतर कॉरिडॉरचे बघता येईल, असे स्वामी म्हणाले.

 

Web Title :- Subramanian Swamy | devendra fadnavis will lose deputy cm post says subramanian swamy over pandharpur corridor issue

 

हे देखील वाचा :

Sanjay Gaikwad | ‘50 खोक्यांची चौकशी करा’ या राऊतांच्या मागणीला संजय गायकवाड यांचे प्रत्युत्तर

Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार

MNS | जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने खोटे शिक्के तयार केले आणि बानवट सही केली; मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा

IPL 2023 | राजस्थान रॉयल्सने अब्दुल बसिथसाठी खर्च केले 20 लाख; कोण आहे अब्दुल बसिथ?

 

Related Posts