IMPIMP

साऊथची ‘मलायका’ मराठमोळ्या हिना पांचाळच्या ‘बोल्ड’ अवतारानं सोशलवर ‘राडा’ !

by bali123
hina panchals

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री हिना पांचाळ (Heena Panchal) हिनं बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. साऊथची मलायका अरोरा (Malaika Arora) म्हणून ओळखली जाणारी हिना पांचाळ अनेकदा तिच्या बोल्ड अवतारामुळं चर्चेतही आली आहे. पुन्हा एकदा तिनं आपल्या लुकनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हिनानं (Heena Panchal) तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं हिरव्या रंगाचा लेहंगा घातला आहे. यातही हिना प्रचंड बोल्ड दिसत आहे. फोटोत तिनं हॉट क्लीव्हेज फ्लाँट केलं आहे. विविध फोटोत ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

हिनाचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

हिनाला डान्स खूप आवडतो. डान्स तिची पहिली पसंती आहे. तिची स्टाईल, अदा आणि डान्स स्टेप्स चाहत्यांनाही भावत असतात. याआधीही तिनं असे अनेक डान्स व्हिडीओ शेअर केले आहेत जे सोशलवर चर्चेत आले होते.

बॉम्बे टाईम्स मासिकातील टॉप 10 बॉलिवूड आयटम गर्ल्सच्या यादीत हिना सातव्या क्रमांकावर होती.
याशिवाय 2015 च्या फोर्ब्स इंडियाच्या यादीतील 100 सेलेब्रिटींमध्ये हिनाचा समावेश होता. हिना अॅक्ट्रेसऐवजी आयटम गर्ल म्हणून जास्त फेमस आहे.
हिना आपल्या फिटनेसला घेऊन खूप जागरूक आहे.
मलायकाच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता चेहरा असणारी हिना पांचाळ मलायकाची Look-ALike म्हणून फेमस आहे. मलायकाप्रमाणेच ती फिट आहे.
हिना अभिनेत्री, डान्सर आणि मॉडेल आहे.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 2014 साली तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
तिनं अनेक साऊथ सिनेमात आयटम साँग केले आहेत.
मोहल्ला, हुक्का, बोगन, राजू ओ राजू, बेबो बेबो असे काही तिचे सिनेमे सांगता येतील.

मराठा आरक्षणात अन्य राज्यांनाही पक्षकार करणार !

Related Posts