IMPIMP

तब्बल 20 वर्षांनंतर येणार RHTDM चा सीक्वल ! क्रिती सेननचं नाव फायनल

by pranjalishirish
kriti-sanon-play-lead-role-sequel-of-Movie-rehna-hai-rehnaa-hai-terre-dil-mein

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza), अभिनेता आर माधवन (R. Madhavan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर रहना है तेरे दिल में (Rehnaa Hai Terre Dil Mein) हा सिनेमा Movie  बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. परंतु या सिनेमानं तरुणाईच्या मनात मात्र घर केलं. सिनेमातील गाणीही खूप गाजली. 19 October 2001 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. आता तब्बल 20 वर्षांनंतर या सिनेमाच्या सीक्वलची तयारी सुरू झाली आहे. आता लवकरच चाहत्यांना याचा सीक्वल पाहायला मिळणार आहे.

एका हिंदी वृत्तानुसार, रहना है तेरे दिल में चे प्रोड्युसर वासु भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी या सिनेमाचा Movie  सीक्वल बनवण्याच्या तयारीत आहे. परंतु यात नवी कास्ट दिसणार आहे. जॅकीला हा सिनेमा Movie  जुन्याच कलाकारांना घेऊन करायचा होता, परंतु अशी माहिती आहे की, सैफ आणि दिया तयार नाहीत त्यामुळं जॅकीनं जुन्या कलाकारांऐवजी नव्या कलकारांना घेण्याचा विचार केला आहे.

अशी माहिती समोर आली आहे की, क्रिती सेननचं  नाव या सीक्वलसाठी फायनल झालं आहे. तिच्या अपोजिट आता 2 हिरोंची निवड केली जाणार आहे. अद्याप तरी त्या दोघांबद्दल कोणती माहिती समोर आलेली नाही. परंतु सिनेमाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरू आहे.

रहना है तेरे दिल में सिनेमाबद्दल बोलायचं झालं दिया मिर्झा आणि आर. माधवन यांचा हा डेब्यू सिनेमा होता. सैफच्या करिअरलाही या सिनेमानं Movie  गती मिळाली होती. तेव्हाच्या सिनेमानं तर तरुणाईच्या मनावर राज्य केलं खरं परंतु आता येणारा सीक्वल या तरुणाईला भावतो की नाही हे पाहणं उत्सुकेचं ठरणार आहे.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts