IMPIMP

Live-in-relationship | लिव्ह-इनमध्ये राहूनही ‘हे’ स्टार्स एकत्र राहू शकले नाहीत, एका वेदनादायक वळणावर तुटले नाते

by nagesh
Live-in-relationship | deepika padukone nihar pandya to ranbir kapoor katrina kaif these stars had ugly breakup after live in relationship entertainment news and gossips

सरकारसत्ता ऑनलाईन आजकाल लिव्ह-इन रिलेशनशिप (Live-in relationship) मध्ये राहणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. विशेष म्हणजे आता बहुतेक लोक त्यांच्या जोडीदाराला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी लिव्ह-इन रिलेशनशिपचा पर्याय निवडतात. बॉलीवूडमध्ये (Bollywood) असे अनेक स्टार्स आहेत जे वर्षानुवर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (live-in relationship) होते. तसेच काही स्टार्स नंतर स्थायिक झाले असले तरी काही बॉलीवूड कपल्स (Bollywood Couples) होते ज्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत जे वर्षानुवर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहूनही सेटल होऊ शकले नाहीत. या यादीत सुशांत सिंग राजपूत-अंकिता लोखंडेपासून दीपिका पदुकोण-निहार पंड्या, रणबीर कपूर आणि कतरिना कैफचा समावेश आहे. यांबद्दलची संपुर्ण माहिती या लेखात पाहु..

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुशांत सिंग राजपूत-अंकिता लोखंडे (Sushant Singh Rajput-Ankita Lokhande)
सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे हे दोघे जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. महत्वाची बाब म्हणजे हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि हे सत्य उघड करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. सगळ्यांसमोर त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र, 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. सुशांत-अंकिता यांची पहिली भेट 2009 मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर झाली होती. ‘झलक दिखला जा सीझन-4’ या रिअॅलिटी शोच्या एका एपिसोडमध्ये सुशांतने अंकिताला प्रपोज केले होते. त्यानंतर अंकितानेही राष्ट्रीय टेलिव्हिजनवर सुशांतचा प्रस्ताव स्वीकारला.अंकिता-सुशांत 6 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये एकत्र होते.

 

रणबीर कपूर-कतरिना कैफ (Ranbir Kapoor-Katrina Kaif)
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ही जोडी एकेकाळी बॉलिवूडची सर्वात आवडती जोडी मानली जात होती. या दोघांचे नाते सहा वर्षे टिकले होते. तसेच दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते. रणबीर आणि कतरिना एकमेकांना ‘जग्गा जासूस’ या चित्रपटानंतर डेट करत होते. विशेष म्हणजे या दोघांची जोडीही चाहत्यांना खूप आवडली. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असत, पण काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी एकमेकांशी संबंध तोडले.त्यानंतर कतरिनाने विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली तर रणबीरने आलिया भट्टशी लग्न केले.

 

प्रियांका चोप्रा-शाहिद कपूर (Priyanka Chopra-Shahid Kapoor)
प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर एकाच इमारतीत राहत होते. पण त्यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपचे गुपित तेव्हा उघड झाले जेव्हा आयटीच्या छाप्यात हा शाहिद कपूर प्रियंकाच्या घरी सापडला. मात्र, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. खरतर शाहिद आणि प्रियांका हे दोघ विशाल भारद्वाजच्या ‘कमिने’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जवळ आले होते. दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर शाहिद-प्रियांकाचे नाते तुटण्याच्या अनेक तर्क-वितर्क लावले जात होते, त्यापैकी एक म्हणजे शाहिदच्या ओव्हरपॉसेसिव्ह वागणुकीला प्रियंका कंटाळली होती आणि त्यामुळे तिने या अभिनेत्याशी ब्रेकअप केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टायगर श्रॉफ-दिशा पटनी (Tiger Shroff-Disha Patni)
लिव्ह-इनमध्ये टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांचीही नावे आहेत. टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी सहा वर्षांनंतर वेगळे झाले आहेत. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही जाहीरपणे बोलले नाही. ना स्वीकारले ना नाकारले. दोघींचे एकत्र आउटिंग बघून चाहते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज बांधत होते. मालदीवमध्ये दोघांनी एकत्र केलेल्या व्हेकेशनमुळेही दोघांमधील जवळीक खूप वाढत असल्याचे दिसून आले. पण आता ताज्या बातम्यांनुसार, दिशा पटनीच्या बाजूने टायगर श्रॉफवर एकतर्फी प्रेम होते. टायगर कधीही अभिनेत्रीसाठी पूर्णपणे वचनबद्ध नव्हता. दिशाला लग्न करायचे होते, तर टायगर श्रॉफला लग्नाची घाई नको होती. हीच गोष्ट त्यांच्या ब्रेकअपचे कारण ठरली.

 

अभय देओल-प्रीती देसाई (Abhay Deol-Preity Desai)
अभिनेता अभय देओल आणि प्रीती देसाई लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. याचा खुलासा खुद्द अभय देओलने ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’मध्ये केला होता. 2011 मध्ये तो प्रीती देसाईसोबत न्यूयॉर्क शहरात राहत होता.दरम्यान काही काळानंतर त्यांचा ब्रेकअपही झाला.

 

जॉन अब्राहम-बिपाशा बसू (John Abraham-Bipasha Basu)
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांचीही नावे आहेत. हे दोघेही मीडियासमोर उघड करायला घाबरले नाहीत. पण 9 वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.जॉन आणि बिपाशा एकत्र छान दिसत होते. केवळ चित्रपटाच्या पडद्यावरच नाही तर पार्टी आणि अवॉर्ड शोमध्येही एकत्र दिसले. दोघांचे बॉन्डिंग पाहून असे वाटत होते की लवकरच हे जोडपे लग्न करणार, पण अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आणि चाहत्यांना धक्काच बसला. त्यांच्या ब्रेकअपबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.बिपाशाला जॉनसोबत लग्न करायचं असल्याचं बोललं जात होतं, पण जॉन लग्नात रस दाखवत नव्हता.यामुळे त्यांचे हे नाते तुटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राजेश खन्ना-टीना मुनीम (Rajesh Khanna-Tina Munim)
अभिनेत्री डिंपल कपाडियापासून वेगळे झाल्यानंतर राजेश खन्ना टीना मुनीमच्या जवळ आले.
दोघांबद्दल असे म्हटले जाते की ते अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
अभिनेत्री टीना मुनीमने आपल्या करिअरची सुरुवात देवानंद यांच्या ‘देश प्रदेश’ या चित्रपटातून केली होती.
टीनाने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवताच राजेश खन्ना यांच्यावर प्रेम झाले होते.
इतकेच नाही तर टीनाने राजेश खन्ना यांना प्रेम मिळवण्यासाठी लग्नाचा प्रस्ताव दिला होता.

 

टीना मुनीम खूप सुंदर होती आणि याच कारणामुळे राजेश खन्ना अभिनेत्रीचा प्रेम प्रस्ताव नाकारू शकले नाहीत.
विवाहित असूनही राजेशची टीनाशी जवळीक वाढू लागली.
लग्नाचा प्रस्ताव दिल्यानंतरही लग्न न झाल्याने टीना मुनीम या सुध्दा राजेश खन्ना यांना सोडुन गेल्या.
आणि ते वेगळे झाले.महत्वाची बाब म्हणजे लिव्ह-इनमध्ये राहूनही हे स्टार्स स्थिरावू शकले नाहीत,
हे नाते एका वेदनादायक वळणावर तुटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Live-in-relationship | deepika padukone nihar pandya to ranbir kapoor katrina kaif these stars had ugly breakup after live in relationship entertainment news and gossips

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी, जाणून घ्या कारण

Bank Strike | बँकेची कामं आताच करून घ्या, ‘या’ दिवशी बँकेच्या सगळ्या सेवा राहणार बंद

Narayan Rane | न्यायालयाच्या आदेशानंतर नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा

 

Related Posts