IMPIMP

Eknath Khadse | एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी, जाणून घ्या कारण

by nagesh
Eknath Khadse | eknath khadse criticizes bjp leader girish mahajan

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन  – राष्ट्रवादीचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे वाद संपूर्ण जिल्ह्याला परीचित आहेत. जळगाव जिल्हा दूध संघावरुन (Jalgaon Milk Sangh) हे वाद घराणेशाहीवर आले होते. एकनाथ खडसे घराणेशाही करतात, असा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. त्यावर आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंत्री गिरीश महाजन तळोदा येथे बोलत असताना, खासदार हिना गावित (Heena Gavit) त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. खासदार गावित यांचे वडील विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) हे मंत्री आहेत. त्यांची दुसरी मुलगी जिल्हा परिषदेची अध्यक्षा आहे. त्यांचे भाऊ आमदार आहेत. एकाच कुटुंबात ही पदे आहेत. त्यांच्या शेजारी उभे राहून मंत्री महाजन असे वक्तव्य करतात. त्यांना ते कसे शक्य आहे. ते मला म्हणातात की, मी घराणेशाही करतो. पण, साधना महाजन देखील अनेक ठिकाणी पदावर आहेत. त्या त्यांच्या कुटुंबातील नाहीत का? त्यांच्या पत्नी साधना महाजन (Sadhana Mahajan) गेली 25 वर्षे सरपंच, जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि आता नगराध्यक्षा आहेत. आपल्याच घरात पदे कशाला पाहिजेत. एक बोट दुसऱ्याकडे दाखविताना तीन बोटे आपल्याकडे असतात, हे महाजन यांनी लक्षात घ्यावे,

 

भाजपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे. नारायण राणे (Narayan Rane),
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अमित शहा (Amit Shah) हे देखील घराणेशाहीत मोडतात.
त्यांना हे नियम लागू होत नाहीत का? असे यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.

 

 

Web Title :- Eknath Khadse | eknath khadase criticize girish mahajan over election

 

हे देखील वाचा :

Bank Strike | बँकेची कामं आताच करून घ्या, ‘या’ दिवशी बँकेच्या सगळ्या सेवा राहणार बंद

Nana Patole | ‘राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे देशात परिवर्तनाची लाट’ – नाना पटोले

Sanjay Raut On CM Eknath Shinde | “…ढोंगी लोक बाळासाहेबांचे वारसदार होऊ पाहत आहेत”; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

Balasaheb Thackeray Memorial | “…ती मागणी वैयक्तिक, पक्षाची अशी भूमिका नाही”; स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीस उत्तरले

 

Related Posts