IMPIMP

Munmun Dutta | …म्हणून अभिनेत्री मुनमून दत्ता फोटोग्राफर्स आणि कॅमेरामॅनवर भडकली

by nagesh
Munmun Dutta | taarak mehta ka ooltah chashmahs munmun dutta objects to behuda comments by photographers

सरकारसत्ता ऑनलाईन  – Munmun Dutta | सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री मुनमुन दत्ता हिचा व्हिडिओ जोरात व्हायरल होताना दिसत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून मुनमुन दत्ता हिला लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांचे वेळोवेळी मनोरंजन केले आहे. सध्या तिचा समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती फोटोग्राफर्स आणि कॅमेरामॅन यांच्यावर संतापल्याचे दिसत आहे. एका कार्यक्रमादरम्यान तिने हे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. (Munmun Dutta)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एका कार्यक्रमात मुनमुन दत्ताने हजेरी लावली होती. यावेळी तिने कशा पद्धतीने फोटोग्राफर्स कलाकारांचे फोटो काढल्यानंतर मागून कमेंट करतात यावर तिने भाष्य केले. यावर बोलताना मुनमुन म्हणाली, “तुम्ही आधी फोटो काढता आणि नंतर आमच्या पाठीमागे आम्हाला कमेंट्स करता. तेव्हा ते आम्हाला ऐकू येत नसतील मात्र तुम्ही जेव्हा व्हिडिओ एडिट करून पोस्ट करता तेव्हा ते स्पष्ट ऐकू येते. त्यामुळे अशा वाईट कमेंट करणं बंद करा. काहीही वाईट कमेंट्स करतात, खरं तर त्यांची कम्युनिटीच अशी झाली आहे”. सध्या मुनमुन दत्ताच्या या व्हिडिओला चाहत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. (Munmun Dutta)

 

 

मुनमुन दत्ताच्या या व्हिडिओला कमेंट करत एका चाहत्यांनी म्हटले की, “अगदी खर आहे तुझं …. हे
पापराझी आधी फोटोज आणि व्हिडिओज घेण्यासाठी सेलिब्रिटींच्या मागे मागे धावतात आणि त्यानंतर
त्यांच्याबद्दल वाईट बोलतात. त्यांचेच फोटो काढता आणि त्यांच्याबद्दलच वाईट बोलता”.
तर अनेकांनी मुनमुन दत्ताच्या या व्हिडिओला समर्थन देखील केले आहे.
अलीकडेच मुनमुन दत्ता युरोप ट्रीपला गेल्यामुळे चर्चेत होती. मात्र या दरम्यान तिचा अपघात झाल्याने तिला
तिची ट्रीप अर्धवट सोडावी लागली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Munmun Dutta | taarak mehta ka ooltah chashmahs munmun dutta objects to behuda comments by photographers

 

हे देखील वाचा :

IND vs BAN Test | भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशच्या अडचणीत वाढ ‘हा’ खेळाडू होऊ शकतो संघाबाहेर

Mumbai High Court On Nawab Malik Bail | नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Shivsena Leader Tanaji Patil | सांगलीतील शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी; ईडीमध्ये तक्रार दाखल

 

Related Posts