IMPIMP

Mumbai High Court On Nawab Malik Bail | नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

by nagesh
Mumbai High Court On Nawab Malik Bail | money laundering case bombay high court refuses to urgently hear the bail plea of ncp leader nawab malik

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Mumbai High Court On Nawab Malik Bail | पैशांची अफरातफर प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आता 6 जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना तुरुंगातून सुटका नाहीच. तसेच न्यायालयाने सक्तवसुली संचलनालयाला मलिक यांच्या प्रकृतीचा अहवाल पुढील दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (Mumbai High Court On Nawab Malik Bail)

 

कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याच्याशी नवाब मलिक यांचे संबंध आहेत. त्यांच्यासोबत पैशांची अफरातफर प्रकरणात नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाने 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली होती. त्यांच्या विशेष न्यायालयात म्हणजे पीएमएलए न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मलिक यांनी 30 नोव्हेंबर रोजी विशेष पीएमएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यावर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाने देखील तात्काळ जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने त्यांना 6 जानेवारी तारीख दिली आहे. (Mumbai High Court On Nawab Malik Bail)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले नवाब मलिक सध्या आरोग्याच्या व्याधींनी त्रस्त आहेत.
ते मे महिन्यापासून एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
त्यामुळे पुढील आदेशापर्यंत ते रुग्णालयात राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मलिक यांनी आरोग्याशी संबंधित कारणामुळे जामीन अर्ज केला होता.
तसेच त्यांच्या वकिलांनी देखील त्यांच्या आरोग्याचा अहवाल सादर करत न्यायालयात जामिनासाठी विनंती केली होती.
पण, न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

 

Web Title :- Mumbai High Court On Nawab Malik Bail | money laundering case bombay high court refuses to urgently hear the bail plea of ncp leader nawab malik

 

हे देखील वाचा :

Shivsena Leader Tanaji Patil | सांगलीतील शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी; ईडीमध्ये तक्रार दाखल

Pune Pimpri Crime | लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, गर्भपात करण्यासाठी दिली 24 तुकडे करण्याची धमकी; वाकड मधील धक्कादायक प्रकार

Janhvi Kapoor Fitness | समोर आले जान्हवी कपूरच्या फिटनेसचे रहस्य, कशी बनली Chubby ते Curvy Baby?

Related Posts