IMPIMP

5 Money Task | डायरीत नोंद करा 30 सप्टेंबरची तारीख, ‘या’ महिन्यात ‘ही’ सर्व कामे पूर्ण करण्याची आहे डेडलाइन; जाणून घ्या

by nagesh
5 Money Task | alert complete these 5 money task before 30 september 2021 from check details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 5 Money Task | इन्कम टॅक्सपासून आधार कार्ड, पॅन कार्डपर्यंत अनेक महत्वाची काम या महिन्यात पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. पैशांच्या व्यवहारांशी संबंधीत अनेक अशी काम आहेत, जी 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करायची आहेत. अन्यथा तुमच्या बँकिंग ट्रांजक्शनपासून शेयर बाजारशी संबंधित ट्रांजक्शन ठप्प होऊ शकते. 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करणे आवश्यक असलेल्या या सरकारी कम्प्लायन्सबाबत (5 Money Task) जाणून घेवूयात…

1. Income Tax Filling Deadline for AY 2020-21/CBDT :

30 सप्टेंबर 2021 त्या व्यक्तींसाठी अखेरची तारीख आहे ज्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न दाखल केले नाही. लास्ट डेट नंतर 5,000 रुपये लेट फायलिंग फी घेतली जाईल. मात्र, एका आर्थिक वर्षात एकुण उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त नसेल तर हे शुल्क 1,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल.

2. PAN Aadhaar Linking :

जर तुम्ही अजूनपर्यंत पॅनकार्डला आधारशी लिंक केले नसेल तर आजच करा. तुमच्याकडे आता केवळ 30 जूनपर्यंतचा वेळच शिल्लक आहे. इन्कम टॅक्स विभागाने पॅनकार्डला आधारशी लिंक करण्याची डेडलाईन 30 जून 2021 ठरवली आहे. यानंतर सुद्धा ज्या लोकांचे पॅन लिंक होणार नाही त्यांना 1 हजार रुपये दंड द्यावा लागेल. या सोबतच पॅन निष्क्रिय केले जाईल.

3. Update your KYC in demat account :

भारतीय प्रतिस्पर्धा आणि विनिमय बोर्ड म्हणजे सेबीने घोषणा केली आहे की, गुंतवणुकदारांच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यात केवायसी माहिती अपडेट कालमर्यादा 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. या तारखेनंतर संबंधीत व्यक्ती शेयर बाजारात व्यापार करू शकणार नाही कारण त्याचे डीमॅट/ट्रेडिंग खाते निष्क्रिय केले जाईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

4. Aadhaar PF Link :

1 सप्टेंबरपूर्वी ईपीएफओ आणि आधार नंबर लिंक (EPFO Link With Aadhaar) केला नाही तर खात्यात कंपनीकडून येणारे योगदान रोखले जाईल. शिवाय तुम्हाला पीएफचे पैसे देखील काढता येणार नाही. यासाठी लवकरात लवकर ईपीएफओ आणि आधार नंबर लिंक करा.

5. Update mobile number in your bank accounts :

1 ऑक्टोबर 2021 पासून बँक खात्यातून ऑटो-डेबिट पेमेंटसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची आवश्यकता असेल. यासाठी मोबाइल नंबर बँक अकाऊंटमध्ये योग्य असणे आवश्यक आहे. याअभावी ऑटो-डेबिट पेमेंट न झाल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा नियम 30 सप्टेंबर 2021 पासून लागू होईल.

 

Web Title : 5 Money Task | alert complete these 5 money task before 30 september 2021 from check details here

 

हे देखील वाचा :

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग , आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

 

Related Posts