IMPIMP

Post Office | फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दरमहा होते कमाई, द्यावा लागत नाही टीडीएस; ‘इतकी’ करावी लागेल गुंतवणूक, जाणून घ्या

by nagesh
 Post Office Schemes 2023 | savings top 5 best small saving post office schemes 2023 interest rate tax benefits and maturity all you need to know

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Post Office | पोस्ट ऑफिसने (Post Office) मंथली इन्कम स्कीम म्हणजे एमआयएस योजना सुरु केली आहे. ही गुंतवणुकदारांना अकाऊंट कालावधी दरम्यान व्याजाच्या रूपात दरमहिना कमाई देते. व्याजदर सरकारद्वारे वेळोवेळी ठरवला जातो आणि ही कमी जोखमीची योजना आहे. या योजनेत कशाप्रकारे गुंतवणूक करू शकता जाणून घेवूयात.

 

 

काय आहे एलिजिबिलिटी

कुणीही प्रौढ एकटा किंवा संयुक्त प्रकारे, पाल्य (अल्पवयीनाकडून) किंवा दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीनाच्या नावावर एमआयएस खाते उघडता येऊ शकते. नॉन इंडिव्हिज्युअलसाठी MIS मध्ये अकाऊंट उघडता येत नाही.

 

 

रक्कम

MIS अकाऊंट 1,000 रुपये आणि त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत उघडले जाऊ शकते. एका अकाऊंटमध्ये 4.5 लाख रुपयापर्यंत आणि जॉईंट अकाऊंटमध्ये 9 लाख रुपयापर्यंत जमा करता करू शकता. खाते उघडण्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यानंतर अकाऊंटच्या मॅच्युरिटीच्या कालावधीपर्यंत व्याज मिळते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

येथे उघडू शकता अकाऊंट

पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एक सामान्य अकाऊंट फॉर्म भरून एमआयएस अकाऊंट उघडू शकता. यासाठी ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, केवायसी कागदपत्र आवश्यक आहेत. अर्ज करण्याच्या दरम्यान चेकसुद्धा द्यावा लागेल.

 

 

अकाऊंट बंद झाल्यास

एमआयएस अकाऊंट उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षासाठी वैध आहे. खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्ष संपण्यापूर्वी अकाऊंट बंद करता येऊ शकत नाही. जर अकाऊंट एक वर्षानंतर 3 वर्षाच्या अगोदर बंद केले गेले तर 2 टक्केची कपात केली जाईल. 3 वर्षानंतर परंतु अकाऊंट उघडण्याच्या तारखेच्या 5 वर्षा अगोदरच पैसे काढल्यास प्रिंसीपल अमाऊंटमधून 1 टक्केची कपात केली जाईल.

 

 

या गोष्टी लक्षात ठेवा

– एखाद्या व्यक्तीला सर्व एमआयएस खात्यात एकुण 4.5 लाख रुपयांची मर्यादा पार करता येऊ शकत नाही.
मात्र, यामध्ये अल्पवयीनाकडून उघडलेल्या खात्याचा समावेश नाही.

– सर्व संयुक्त धारकांचा गुंतवणुकीत बरोबरीने हिस्सा असतो.

– जर खातेधारक मासिक व्याजाचा दावा करण्यात असमर्थ ठरला तर कोणतेही अतिरिक्त व्याज मिळणार नाही.

– एमआयएस अकाऊंटमध्ये 6.6 टक्के व्याज दिले जाते.

 

Web Title : Post Office | know about post office mis scheme premium benefits interest rates

 

हे देखील वाचा :

Skin Care Tips | लॅपटॉप आणि मोबाइलच्या अधिक वापरामुळे तुमच्या त्वचेचे होऊ शकते नुकसान, ‘या’ पध्दतीनं काळजी घ्या

Pune Crime | तडीपार गुंडाची पोलिसांना धक्काबुक्की, धमकी देत म्हणाला – ‘तुम्हाला बघून घेतो’

Aadhaar card बनवणं झालं अगदी सोप, परंतु बदल केला तर बदलतील नाही ’नाते’; आता पती, वडिलांचा उल्लेख नाही, त्याठिकाणी ’केयर ऑफ’

 

Related Posts