IMPIMP

Salary Plus Account | जर तुमचे सुद्धा असेल ‘या’ बँकेत सॅलरी अकाऊंट, तर मिळेल एक कोटी रुपयांची ‘फ्री’ सुविधा; जाणून घ्या

by nagesh
Salary Plus Account | boi salary plus account scheme specially crafted for salaried employees

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Salary Plus Account | सॅलरीड क्लास (salaried class) साठी मोठी बातमी आहे. बँक ऑफ इंडिया (Bank of India) ने सॅलरीड क्लाससाठी एक असे अकाऊंट सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांना एक कोटी रुपयांपर्यंत फायदा (benefits up to Rs one crore) मिळू शकतो. बँक ऑफ इंडियाने या अकाऊंटचे नाव सॅलरी प्लस अकाऊंट स्कीम (Salary Plus Account Scheme) ठेवले आहे. बँकेकडून अशाप्रकारची माहिती ट्विटर (Twitter) अकाऊंटद्वारे देण्यात आली आहे. या सॅलरी अकाऊंटची कोणती वैशिष्ट्ये आहेत जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सॅलरी प्लस अकाऊंट स्कीमची वैशिष्ट्ये (features of Salary Plus Account Scheme )

सॅलरी प्लस अकाऊंटची घोषणा

बँक ऑफ इंडियाने माहिती दिली आहे की, सॅलरी प्लस अकाऊंट स्कीममध्ये तीन प्रकारच्या सॅलरी अकाऊंटची सुविधा दिली गेली आहे. ज्यामध्ये पहिले अकाऊंट पॅरा मिलिट्री फोर्स, केंद्रीय आणि राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी आहे.

दुसरे अकाऊंट युनिव्हर्सिटी, कॉलेज आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये काम करणार्‍या लोकांसाठी आहे. तर तिसरे अकाऊंट प्रायव्हेट सेक्टरच्या कर्मचार्‍यांसाठी बनवले आहे. हे सॅलरी अकाऊंट मेंटन करण्याची आवश्यकता नाही.

 

 

एक कोटी रुपयांचा फ्रीमध्ये मिळेल फायदा

बँकेच्या या स्पेशल अकाऊंट होल्डरला 1 कोटी रुपयांपर्यंत फ्री एयर अ‍ॅक्सीडेंटल इन्श्युरन्सची सुविधा दिली आहे. सॅलरी अकाऊंट होल्डरला बँक 30 लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅक्सीडेंटल डेथ कव्हर सुद्धा देते.

 

 

या सुविधादेखील मिळतील

– 2 लाख रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा.

– ओवरड्राफ्ट अंतर्गत बॅलन्स नसेल तरी 2 लाख रुपये काढू शकता.

– फ्री गोल्ड इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड मिळेल.

– वार्षिक 100 चेक लीव फ्री.

– डीमॅट अकाऊंट्सवर एएमसी चार्ज नाही.

 

 

प्रायव्हेट नोकरी वाल्यांसाठी

प्रायव्हेट नोकरी करणार्‍यांसाठी बँक ऑफ इंडियाच्या नवीन सॅलरी अकाऊंटचा मोठा फायदा होऊ शकतो. जरी सॅलरी 10000 रुपये महिना असेल तरी या अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्सची आवश्यकता नाही. सॅलरी अकाऊंट होल्डरला 5 लाख रुपयांचे ग्रुप पर्सनल अ‍ॅक्सीडेंट डेथ इन्श्युरन्स कव्हर मिळेल. सर्वांना फ्री ग्लोबल डेबिट कम एटीएम मिळेल.

 

Web Title : Salary Plus Account | boi salary plus account scheme specially crafted for salaried employees

 

हे देखील वाचा :

Karuna Sharma | करुणा शर्मांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच, ‘या’ कारणामुळं सुनावणी 18 तारखेला

Sangli Crime | सांगलीतील बडया व्यावसायिकाची कोटयावधी रूपयांची फसवणूक, दुबईतील चौघांविरूध्द गुन्हा

Amruta Fadnavis | ‘मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बोलते, विचार मांडते’; अमृता फडणवीस यांनी उलगडलं त्यांचं जगण्याचं आणि कामाचं पॅशन

 

Related Posts