IMPIMP

गर्भवती पत्नीला चक्क 1 हजार फूट उंचीवरून दिले ढकलून, जाणून घ्या कृत्यामागील कारण

by sikandershaikh
international news | husband-pushed-pregnant-wife-

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)international news | पतीने आपल्या गर्भवती पत्नीसोबत जे कृत्य केले ते वाचून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. पत्नीच्या नावाने काढलेल्या विम्याची रक्कम मिळावी म्हणून पतीने चक्क तिला 1 हजार फूट उंचीवरून ढकलून दिले. यात सात महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पतीला अटक केली आहे. तुर्कीमध्ये 2018 मध्ये ही घटना घडली आहे.

समेरा आयसाल असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हाकान आयसाल (वय 40) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर या निर्दयी पतीने 40 हजार लीरा म्हणजे साधारण 40 लाख रूपयांचा क्लेम केला. पण तपासादरम्यान तो रद्द करण्यात आला.

Mirror च्या रिपोर्टनुसार, तुर्कीमध्ये जून 2018 मध्ये ही घटना घडली आहे. दक्षिण-पूर्व तुर्कीच शहर मुगला येथे राहणारा 40 वर्षीय हाकान आयसाल पत्नी सेमरा आयसालसोबत बटरफ्लाय व्हॅलीला फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यांनी डोंगरावर फोटोही काढले. सेल्फी घेतल्यानंतर हाकानने पत्नी सेमराला 1 हजार फूट उंचीवरून ढकलून दिल्याने खाली पडून तिचा मृत्यू झाला.
हाकानने केलेल्या कृत्याचे कारण समोर आले आहे.
हाकानने काही दिवसांपूर्वी पत्नीच्या नावाने एक विमा काढला होता.
विम्याचा हाकान हा एकमेव नॉमिनी आहे.
विम्याच्या नियमांनुसार जर सेमराचा एखाद्या दुर्घटनेत आकस्मिक मृत्यू झाला तर नॉमिनीला 40 हजार लीराचा क्लेम मिळणार होता.
त्यामुळे त्याने हे कृत्य केले होते. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे.

(international news) तुर्कीच्या स्थानिक न्यायालयाने हाकानला तुरूंगात टाकण्याचा आदेश दिला आहे.
तर दुसरीकडे मृत महिलेच्या कुटुंबियांनी खुलासा केला आहे की, समेराच्या पती हाकानने तिच्या नावाने तीन लोनही घेतले होते.
कदाचित ते हडपण्यासाठीच त्याने तिची हत्या केली. कुटुंबियांनी सांगितले की, सेमराला उंचीची भीती वाटत होती.
तरी मुद्दामहून तो तिला 1 हजार फूट उंच डोंगरावर घेऊन गेल्याचा आरोप केला आहे.

Related Posts