IMPIMP

पुन्हा परतला पाकिस्तानचा चांद नवाब ! यावेळी, राष्ट्रपतींच्या मुलाखतीसह धमाल, Video व्हायरल

by pranjalishirish
pakistani reporter chand nawab doing interview with president arif alvi video goes to viral

सरकारसत्ता ऑनलाइन टीम :- पाकिस्तानचा चांद नवाब  chand nawab तुम्हाला आठवत असेलच. एका व्हिडिओने त्याला रात्रीतून जगभरात प्रसिद्ध केले. त्याचा अंदाज लोकांना चांगलाच पसंत पडला. तोच चांद नवाब chand nawab पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण, यावेळी व्हिडिओ खूप खास आहे. कारण, चांद नवाबाने यावेळी पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांची मुलाखत घेतली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पत्रकार ‘नाईला इनायत’ ने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये चांद नवाब हे पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याशी बोलत आहेत. चांद नवाब म्हणतात की, सद्र ए पाकिस्तान डॉक्टर आरिफ अल्वी साहेब आमच्यासमवेत उपस्थित आहेत. जे रविवारी गोल्फ खेळत आहेत. त्याच वेळी पाकिस्तानचे राष्ट्रपती चांद नवाब म्हणाले की, ‘मैं समझता हूं. आपको मुबारक हो. पाकिस्तान जिस अंदाज से तरक्की कर रहा है तो उसके अंदर समझता हूं सबका दिल, सबका दिमाग उसमें लगा है.’

पुन्हा एकदा चर्चेत आले चांद नवाब

दरम्यान, ईदच्या वेळी चांद नवाब रेल्वे स्टेशनवर रिपोर्टींग करत ​​होते, त्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
त्याचबरोबर त्याच्या नव्या व्हिडिओने देखील सोशल मीडियावर जोरदार धमाल सुरू केली आहे.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचे निधन

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना ‘कोराना’ची बाधा

Related Posts