IMPIMP

Immunity | इम्यूनिटी वाढवणार्‍या जीवनशैलीसाठी आयुष मंत्रालयाने सुरू केले अभियान, 75 लाख लोकांना करणार ‘रोगप्रतिबंधक औषधां’चे वितरण

by nagesh
Immunity | ayush ministry started campaign distribute prophylactic medicines to 75 lakhs people to ensure immunity boosted lifestyle

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Immunity | देशभरात 75 लाख लोकांना आयुष प्रोफिलॅक्टिक मेडिसिन (Ayush Prophylactic Medicines), डाएट आणि जीवनशैलीवर लिहिलेली मार्गदर्शक तत्त्वे वितरित करण्यासाठी सरकारने एक अभियान सुरू केले आहे. महामारीच्या या कठिण काळात सरकारच्या या अभियानातून इम्यूनिटी (Immunity ) वाढवणारी जीवनशैली (lifestyle) चांगली बनवण्यात मदत होईल.

 

 

इम्युनो-कॉम्प्रोमाईज्ड ब्रॅकेटवर लक्ष

PHDCCI चे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप मुल्तानी यांनी एका वक्तव्यात म्हटले की, हा उपक्रम इम्यूनिटीयुक्त जीवनशैलीसाठी एक महत्वाची भूमिका पार पाडेल. कोरोना संकटाच्या या काळात लोकांच्या इम्युनो-कॉम्प्रोमाईज्ड ब्रॅकेट (ज्येष्ठ आणि फ्रंटलाइन वर्कर्स) वर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या अभियानाची सुरुवात केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि आयुष मुंजपारा राज्यमंत्री (MoS) यांनी 2 सप्टेंबरला केली होती.

औषधाचे 75 लाख लोकांना वाटप

या अभियानांतर्गत, पुढील वर्षात इम्यूनिटी वाढवणारे औषध आणि कोरोना महामारीला नियंत्रणात ठेवणारे उपाय लक्षात घेऊन तयार केलेली लेखी मार्गदर्शक तत्त्वांचे वितरण देशभरात 75 लाख लोकांना केले जाईल. आयुष मंत्रालयाचे हे अभियान 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाचे लोक आणि फ्रंटलाइन वर्कर्सवर फोकस करेल.

CCRAS ने तयार केले आयुर्वेदिक औषधांचे किट

कोरोना महामारीला प्रतिबंध करणार्‍या आयुष मेडिसिनच्या किटमध्ये संशामणी वटी (Sanshamani Vati) (ज्यास गुडुची किंवा गुळवेल घन वटी सुद्धा म्हटले जाते) आणि अश्वगंधा घन वटी (Ashwagandha Ghan Vati) आहे.

रोगप्रतिबंधक आयुर्वेदिक औषधांचे हे किट आणि मार्गदर्शक तत्त्व सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक मेडिसिन (CCRAS) ने तयार केले आहे.

 

सर्वांसाठी आरोग्य

कोरोना महामारीला प्रतिबंध लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या विशेष अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी
आयोजित एका सभेला संबोधित करताना केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटले होते की,
या अभियानाचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आणि अभियानाला खरे रूप देण्याचे योगदान आहे.

जेणेकरून ‘सर्वांसाठी आरोग्य’ दिले जाऊ शकते.
त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी सात कामांना सूचीबद्ध केले आहे
आणि त्यापैकी पहिले काम ज्येष्ठांची देखभाल करणे आहे.

 

 

Web Title : Immunity | ayush ministry started campaign distribute prophylactic medicines to 75 lakhs people to ensure immunity boosted lifestyle

 

हे देखील वाचा :

Karuna Munde | करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं… (व्हिडिओ)

Gold Price Update | 9000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त झालं सोनं, इथं जाणून घ्या 14,18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर

Pune Crime | पुण्यात 29 वर्षीय महिला पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या, पोलिस दलात प्रचंड खळबळ

 

Related Posts