IMPIMP

Kolhapur Anti Corruption | लाच घेताना पोलिसासह दोन पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन  Kolhapur Anti Corruption | पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे खोटे सांगून आणि गुन्ह्यात मदत तसेच FIR प्रत देण्यासाठी 5 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या (Accepting Bribe) पोलीस कॉन्स्टेबलसह (Police constable) दोन पंटरना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Kolhapur Anti Corruption) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार) सायंकाळी हातकणंगले तालुक्यातील वडगाव पोलीस ठाण्यात (Wadgaon Police Station) करण्यात आली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पोलीस कॉन्स्टेबल अशोक कृष्णा जाधव (Ashok Krishna Jadhav), पंटर चेतन गावडे Chetan Gawde (रा. कोरेगाव, ता. वाळवा) आणि प्रीतम दीपक ताटे Pritam Deepak Tate
(रा. वडगाव, ता. हातकणंगले) अशी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे (Kolhapur Anti Corruption) पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwant)
आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती वडगाव परिसरात वास्तव्यास आहे. त्यांच्यावर मटका जुगार (gambling) केस दाखल असल्याचे खोटे सांगून पाच हजार रुपयांची लाच मागितली.
तसेच या गुन्ह्यात मदत करण्याबरोबरच दाखल गुन्ह्याची मूळ प्रत घेऊन देतो असेही त्यांनी सांगितले.
त्यांच्या बोलण्याचा तक्रारदार यांना संशय आल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
पथकाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपयाची लाच घेताना पंटर दीपक ताटे याला रंगेहाथ पकडले.

 

Web Title : Kolhapur Anti Corruption | Two punters with police caught taking anti-corruption bribe

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याचे दर पुन्हा उतरले; जाणून घ्या नवीन दर

Pune Court | कुरकुंभ MIDC परिसरामध्ये अमली पदार्थाची निमिर्ती केल्याप्रकरणी दोघांचा जामीन अर्ज दुसर्‍यांदा फेटाळला

Pune police | पोलिसांच्या स्पर्धेला रिक्षावाल्यांचे प्रत्युत्तर, पोलिसांसाठी आयोजित केली 1 कोटी बक्षिसांची स्पर्धा

 

Related Posts