IMPIMP

Five Police Officers Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

by omkar

जालना : सरकारसत्ता ऑनलाइन –Five Police Officers Suspended |कोणत्याही परवानगी शिवाय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (union minister raosaheb danve) यांच्या जाफराबाद (jafrabad) येथील जनसंपर्क कार्यालयाची (public relations office) झाडाझडती केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख (superintendent of police vinayak deshmukh) यांनी पोलिसांचं वर्तन बेकायदेशीर आणि बेशिस्तपणाचं असल्याचा ठपका ठेवत दोन फौजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित (five police officer suspended) केलं आहे. याप्रकरणी रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी तक्रार दिली होती.
पोलीस अधीक्षकांनी एकाच वेळी 5 पोलिसांना तडकाफडकी निलंबित (five police officer suspended) केल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे, पोलीस हवालदार मंगलसिंग रायसिंग सोळंके,
पोलीस कर्मचारी सचिन उत्तमराव तिडके आणि पोलीस कर्मचारी शाबान जलाल तडवी अशी निलंबित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची (police officer and staff) नावं आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोणतीही परवानगी न घेता दि. 11 जूनला संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (union minister raosaheb danve) यांच्या जनसंपर्क कार्यलयाची तपासणी केली.

यावेळी पोलिसांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत कामकाजाची कागदपत्रे देखील सोबत नेली,
अशी तक्रार रावसाहेब दानवे यांनी केली होती.
दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणाची चौकशी करून दोन पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जणांचं निलंबन (five police officer suspended) केलं.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी  केलेल्या तपासणीत नेमकं काय निष्पन्न झालं याचा खुलासा मागितला आहे.
भाजपच्या बड्या नेत्याच्या कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी केल्यामुळे 2 पोलीस उपनिरीक्षक आणि 3 पोलिसांना निलंबित करण्यात आल्यानंतर घडलेला प्रकार नेमका काय होता,
हे समजण्यास आणखी काही गोष्टींचा खुलासा होणे गरजेचे आहे असे काही जण सांगत आहेत.

Also Read:

  1. Sambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, राजे म्हणाले –  ‘संभाजी राजेंच्या आंदोलनाला माझा पाठिंबा’ (Video)
  2. anti corruption bureau pune | पुणे महापालिकेतील महिला अधिकारी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, 30 जून रोजी होणार होत्या निवृत्त
  3. Assembly elections | आगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत लढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं विधान, म्हणाले…
  4. Chhatrapati Shahu Maharaj | अजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…
  5. Horoscope 15 june | 15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे मंगळवार

Related Posts