IMPIMP

Mumbai Police Recruitment | पोलीस भरतीत महाघोटाळा? उमेदवाराकडून 10 ते 15 लाख घेतल्याचा काँग्रेस आमदाराचा आरोप

by nagesh
Mumbai Police Recruitment | scam in police recruitment allegation by jalna congress mla kailas gorantyal

जालना : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्रात सध्या पोलीस भरती सुरु आहे. मुंबई पोलीस भरती (Mumbai Police Recruitment) लेखी परीक्षा (Written Exam) 7 मे रोजी मुंबईतील विविध केंद्रावर पार पडली. मात्र या पोलीस भरतीमध्ये (Mumbai Police Recruitment) महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल (MLA Kailas Gorantyal) यांनी केला आहे. पोलीस भरती होण्यासाठी एका-एका उमेदवाराकडून 10 ते 15 लाख रुपये घेतले जात असल्याचे गोरंट्याल यांनी म्हटले आहे. तसेच पोलीस भरतीत मोठं रॅकेट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलीस भरतीची फेर परीक्षा घ्या अन्यथा उपोषणाला (Hunger Strike) बसू, असा इशारा गोरंट्याल यांनी दिला आहे.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

नुकताच पोलीस भरतीचा निकाल लागला आहे. परंतु मुंबईत झालेल्या परीक्षेत (Mumbai Police Recruitment) मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी गोरंट्याल यांची भेट घेतली. यावेळी पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा (Police Recruitment Scam) झाला असून एका उमदेवाराकडून दहा ते बारा लाख रुपये घेतले असून यामध्ये मोठं रॅकेट काम करत असल्याचा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. पोलीस भरतीची परीक्षा पुन्हा घ्यावी अन्याथा आपण उपोषणाला बसू असा इशारा त्यांनी दिला आहे.

लेखी परीक्षेत हायटेक कॉपी

मुंबईतील पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये हायटेक कॉपी (Hi-tech Copy) करुन अनेक विद्यार्थी परीक्षेला
बसले असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेने केली आहे.
या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलिसांनी समन्वय समितीकडे असलेले पुरावे तपासणीसाठी
मागवले आहेत. परीक्षेच्या दिवशी कॉपी करताना पकडण्यात उमेदवारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात चार गुन्हे
(FIR) दाखल केले आहेत. उमेदवारांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास
आले होते.

Web Title : Mumbai Police Recruitment | scam in police recruitment allegation by jalna congress mla kailas gorantyal

Related Posts