IMPIMP

ACB Trap News | जिल्हा परिषद आणि सामान्य रुग्णालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना एसीबीकडून अटक

by sachinsitapure
ACB Trap News

जालना : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | जिल्हा परिषद विभागातील एका शिक्षकाचे प्रलंबित बिल पूर्ण करुन ते मंजुरीसाठी पाठवण्यासाठी 23 हजार रुपये लाच घेताना प्राथमिक शिक्षण विभागाच्या वरीष्ठ सहाय्यक व सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रियागार परिचर यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.29) प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा परिषद जालना (Zilla Parishad Jalna) येथे. (ACB Trap News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

वरिष्ठ सहाय्यक शिवदास मोतीराम राठोड Senior Assistant Shivdas Motiram Rathod (वय 52 रा.शांतीनिकेतन कॉलनी, आकाशवाणीचे पाठीमागे, छत्रपती संभाजीनगर), सामान्य रुग्णालय जालना येथील शस्त्रक्रियागार परिचर दीपक प्रभाकर भाले (वय 59 रा. सोरटीनगर जालना) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोन लाचखोरांची नावे आहेत. याबाबत 49 वर्षीय शिक्षकाने जालना एसीबीकडे (Jalna ACB) तक्रार केली आहे. (ACB Trap News)

जिल्हा परिषद प्राथमिक विभागातील एका शिक्षकाच्या पायाची शस्त्रक्रिया ऑक्टोबर 2021 मध्ये झाली होती.
याचा खर्च चार लाख 61 हजार 412 रुपये वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात
ऑगस्ट 2022 मध्ये सादर करण्यात आला होता. परंतु तेव्हापासून या देयकामध्ये काही ना काहीतरी त्रुटी दाखवत हे
देयक प्रलंबित ठेवण्यात आले. प्रलंबित वैद्यकीय बील परीपुर्ण करुन मंजुरीला पाठविण्यासाठी दि. 24.11.2023 रोजी शिवदास राठोड याने 25 हजार रुपये लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 24 नोव्हेंबर रोजी लाच मागितल्याची पंचासमक्ष खात्री केली आणि सापळ्याचे नियोजन लावले.

बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक शिवदास राठोड
यांनी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी पाच हजार रुपये हे काम झाल्यानंतर देण्याचे ठरले आणि
वीस हजार रुपये घेताना त्यांना रंगहाथ पकडले. याचवेळी सामान्य रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियागार परिचर म्हणून
सोरटी नगर येथे राहणारा कर्मचारी दीपक भाले यांनी स्वतःसाठी पाच हजारांची लाच मागितली तडजोडी अंती
तीन हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोघांनाही पकडले आहे.
या दोघांवर कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole) यांच्या
मार्गदर्शनाखाली एसीबी जालना पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे (DySP Kiran Bidve),
पोलीस अंमलदार गजानन घायवट, अतिश तिडके, गणेश बुजाडे, गणेश चेके, शिवलिंग खुळे यांच्या पथकाने केली.

Related Posts