IMPIMP

Kolhapur Crime | विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू, अभियंत्यावर FIR

by nagesh
Kolhapur Crime | Tragic death of a schoolgirl by electric shock, FIR on engineer

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Kolhapur Crime | बोअरची मोटार सुरु करताना जोरदार विजेचा धक्का (Electric shock) बसून एका शाळकरी मुलीचा (school girl) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. ही घटना कोल्हापूरातील (Kolhapur Crime) बसस्थानक परिसरात रविवारी (दि. 16) सकाळी घडली आहे. याप्रकरणी बांधकाम साईट अभियंता (Construction Site Engineer) संदीप संकपाळ (रा. ताराबाई चौक) याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अंकिता अनिल शेळके (वय-15 रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे विजेचा धक्का बसून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. अंकिता इयत्ता 9 वी मध्ये शिकत होती. याप्रकरणी तिचे मामा महेश सोनवणे (रा. राजेंद्रनगर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात (juna rajwada police station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभियंता संकपाळ याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप संकपाळ यांचे बसस्थानक परिसरात बांधकाम सुरु आहे. अंकिताची आई नूतन शेळके बांधकामावर वॉचमन व पाणी मारण्याचे काम करतात. बांधकामावर असलेल्या बोअर मीटरमध्ये मागील आठवड्यापासून विद्युत प्रवाह होत असल्याने तातडीने दुरुस्त
करुन घेण्याबाबत नूतन शेळके यांनी संकपाळ याला वारंवार सांगितले. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष
करुन हलगर्जीपणा करुन मीटर दुरुस्ती केली नाही. रविवारी सकाळी 10 वाजता अंकिता इलेक्ट्रिक
बोर्डाचे बटण सुरु करत असताना तिला विजेचा जोरादर धक्का बसला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू
झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Kolhapur Crime | Tragic death of a schoolgirl by electric shock, FIR on engineer

 

हे देखील वाचा :

Afghanistan Crisis | ’आम्ही हळु-हळु मरून जाऊ…’ अफगाणमध्ये बिघडलेल्या स्थितीवर आश्रूंना वाट करून देणार्‍या मुलीचा हृदयद्रावक व्हिडिओ वायरल

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | ‘ड्राय डे’च्या दिवशी चाकूचा धाक दाखवून टोळक्याने लुटल्या दारुच्या बाटल्या

 

Related Posts