IMPIMP

Pune Crime | ‘ड्राय डे’च्या दिवशी चाकूचा धाक दाखवून टोळक्याने लुटल्या दारुच्या बाटल्या

by nagesh
Pune Ganeshotsav 2022 | sale of liquor is banned in pune for two days orders of collector dr rajesh deshmukh pune

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘ड्राय डे’ (dry day) असताना चौघा जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये शिरुन चाकूचा धाक दाखवून दारुच्या बाटल्या, बिसलरी बाटल्या व थम्सअपच्या बाटल्या लुटून नेल्या. जुन्या पुणे – मुंबई रोडवरील (old pune mumbai highway) साते गावच्या हद्दीतील ब्राम्हणवाडी फाटा येथील हॉटेल सनराईजमध्ये (hotel sunrise) रविवारी सायंकाळी ७ वाजता हा प्रकार घडला. वडगाव मावळ पोलिसांनी (vadgaon maval police) मंगेश मोरे व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी राजन बॅरिस्टर सिंग (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. राजन सिंग यांचे हॉटेल सनराईज आहे. स्वातंत्र्य दिन असल्याचे त्यांचा बिअर बार बंद होता. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मंगेश मोरे व त्याचे तीन साथीदार हॉटेलमध्ये आले. त्यांनी सिंग यांना आम्हाला दारू पाहिजे, आम्हाला लवकर दारु दे, असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी आज स्वातंत्र्य दिन आहे. ड्राय डे असल्याने आमचा बिअर बार बंद आहे. असे सांगितल्यावर ते मोठ मोठ्या आवाजात शिवीगाळ करु लागले.

 

आम्हाला आताचे आत्ता दारु द्यावीच लागेल. नाही तर आम्ही तुझे हॉटेल फोडून टाकू,
असे म्हणून मोरे याने त्यांच्याजवळील चाकू काढून फिर्यादीला दाखविला.
आम्हाला दारु देत नाही, तुझा आज गेमच करतो, असे म्हणत त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने चार रॉयल स्टाँग कंपनीच्या दारुच्या बाटल्या, बिसलरी बाटल्या व थम्सअपच्या बाटल्या घेऊन गेले.
जाताना आरोपींनी फिर्यादीला आम्हाला दरमहा ५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाही तर तुझे हॉटेल तोडून टाकेल व तुला जीवे मारुन टाकील, अशी धमकी दिली.
वडगाव मावळ पोलिसांनी (vadgaon maval Police) चौघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Liquor bottles looted by mobs on Dry Day

 

हे देखील वाचा :

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात पुन्हा लागू शकतो लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा

Pune Crime | गल्लीतील ‘भाई’ म्हणविणार्‍याने कोयत्याने वार करुन तरुणाच्या खुनाचा केला प्रयत्न; हडपसर पोलिसांकडून चौघांविरूध्द गुन्हा

Covid 19 Compensation | कोरोनाने मरणार्‍यांच्या कुटुंबियांना किती मिळेल भरपाई? ठरवण्यासाठी सरकारला SC कडून मिळाला आणखी 4 आठवड्यांचा वेळ

Related Posts