IMPIMP

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver prices rise again find out today rates in maharashtra 8 april 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | मागील काही आठवड्यापासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळत आहे. सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने बदल होणाऱ्या किंमतीत आता सध्याही सोन्याच्या भावात घसरण दिसून येत आहे. कालच (सोमवारी) सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली होती. मात्र, आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) नुसार सोन्याचा भाव 47,223 रुपये प्रति तोळावर आहेत. तर, चांदीच्या किंमतीत (Silver) 0.22 टक्क्यांनी वाढ होऊन 63,598 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

गतवर्षी सोन्याचा भाव (Gold Price) 56,200 रुपये प्रति तोळाचा रेकॉर्ड स्तरवर होता. मागील वर्षीच्या तुलनेत सोन्याचा भाव सध्या स्वस्त आहे. सध्या
सोन्याचा भाव 47,223 रुपये प्रति तोळावर स्थिर आहे. मागील काही आठवड्यात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. मात्र त्यानंतर सोन्याच्या
किंमतीत वारंवार घट पाहायला मिळाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव (Gold Price) 1,787.90 डॉलर प्रति औंसवर स्थिर आहेत. तर
चांदीचा भाव (Silver Price) 0.3 टक्के वाढीमुळे 23.89 डॉलर प्रति औंसवर आहेत. तर प्लॅटिनमच्या दरात 0.1 टक्क्याने वाढ होऊन दर 1,023.52
डॉलर आहे.

 

या दरम्यान, सोने आणि चांदीच्या किंमती जाणून घेण्यासाठी ग्राहकाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे.
काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल.
तसेच, सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटवरून जाणून घेऊ शकणार आहेत.
ग्राहकाला सोन्याची (Gold Price) शुद्धता तपासायची असेल
तर सरकारकडून अ‍ॅप’ BIS Care app च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.
या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक फक्त सोन्याची शुद्धताच नाही तर त्याबाबत तक्रार देखील करू शकता.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today on 17 august 2021 gold rates drop and silver rates rise check latest price

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘ड्राय डे’च्या दिवशी चाकूचा धाक दाखवून टोळक्याने लुटल्या दारुच्या बाटल्या

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात पुन्हा लागू शकतो लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा

Pune Crime | गल्लीतील ‘भाई’ म्हणविणार्‍याने कोयत्याने वार करुन तरुणाच्या खुनाचा केला प्रयत्न; हडपसर पोलिसांकडून चौघांविरूध्द गुन्हा

 

Related Posts