IMPIMP

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांचा होईल मोठा फायदा ! नवी वेतनमानाची झाली घोषणा, सॅलरीत होईल ‘इतकी’ वाढ

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission big news for central employees announcement of finance ministry over to da

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | ऑक्टोबर 2021 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांना (central government employees) मिळणारा डीए (Dearness Allowance) तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. त्यानंतर राज्य कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमिवर, हिमाचल प्रदेश सरकारने 6 व्या वेतन आयोगाअंतर्गत आपल्या कर्मचार्‍यांसाठी नवीन वेतनश्रेणी जाहीर केली आहे. जे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत, त्यांना दोन वर्षात नियमित केले जाईल, असे शासनाच्या अधिकृत प्रवक्त्याच्या वतीने सांगण्यात आले. (7th Pay Commission)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी अराजपत्रित कर्मचारी महासंघाच्या संयुक्त समन्वय समितीच्या (जेसीसी) कार्यक्रमाला संबोधित करताना राज्याची नवीन वेतनश्रेणी जाहीर केली. या घोषणेमध्ये ही नवीन वेतनश्रेणी 1 जानेवारी 2016 पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले.

 

माहितीनुसार, सुधारित वेतनश्रेणीनुसार जानेवारी 2022 चा पगार फेब्रुवारी 2022 मध्ये मिळणार आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांना तीन वर्षात नियमित केले जात असताना आता या घोषणेनंतर त्यांना दोन वर्षातच नियमित केले जाणार आहे.

कधी पासून लागू होईल सुधारित पेन्शन
मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या घोषणेमध्ये असे म्हटले आहे की, राज्य सरकार आपल्या एकूण बजेटपैकी सुमारे 43% कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर खर्च करत आहे. 6वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तो 50 टक्क्यांपर्यंत असेल.

 

या वाढीमुळे कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ अपेक्षित आहे. सुधारित पेन्शनचा कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2016 पासून लाभ दिला जाईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

केंद्रीय कर्मचार्‍यांना सुद्धा मिळेल लाभ
इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशन (IRTS) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमेन (NFIR) यांनी कर्मचार्‍यांचा HR वाढवण्याची मागणी केली आहे. ज्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. मागणीनुसार वाढ केल्यास कर्मचार्‍यांना मोठा फायदा होणार आहे. घरभाडे भत्त्यात वाढ नवीन डीए वाढीच्या आधारे केली जाईल. (7th Pay Commission)

 

महागाई भत्ता वाढवण्यावर होत आहे विचार
नवीन वर्षात केंद्रीय कर्मचार्‍यांना 3% महागाई भत्ता पुन्हा दिला जाऊ शकतो, कारण तो जानेवारी 2020 मध्ये वाढवण्यात आला होता.
त्याच आधारावर यंदाही महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
असे झाल्यास कर्मचार्‍यांना महागाई भत्ता 34 टक्के दराने मिळेल आणि कमाल पगार 20 हजार रुपयांनी वाढू शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission these employees will get big benefit announcement of new pay scale increase in salary

 

हे देखील वाचा :

Sameer Wankhede | NCB अधिकारी समीर वानखेडेंची आणखी एक कारवाई ! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करुन 2 महिलांना अटक

Ambernath Crime News | अंबरनाथ शहरातील धक्कादायक घटना ! फिरायला आलेल्या तरुणीवर 3 मित्रांनी केला सामुहिक बलात्कार

LIC Bachat Plus Scheme | एलआयसीच्या बचत प्लस योजनेत होतो दुप्पट फायदा, सेव्हिंगसह मिळेल लाईफ इन्श्युरन्सचा फायदा; जाणून घ्या सर्वकाही

 

Related Posts