IMPIMP

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! दसरा, दिवाळी सणाच्या तोंडावर महागाई भत्त्यात 11 % वाढ

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission big news for central employees announcement of finance ministry over to da

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन 7th Pay Commission | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दसरा (Dussehra), दिवाळी (Diwali) सणांच्या तोंडावर राज्य सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. सणांच्या तोंडावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या (State Govt Employees) महागाई भत्त्यात (Dearness Allowance Increase) वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 11 टक्यांनी वाढ (7th Pay Commission) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (7th Pay Commission) 17 टक्क्यांवरुन 28 टक्के करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने
(Mahavikas Aghadi government) घेतला आहे. 1 जुलै 2021 पासून हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे.
जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत लवकरच आदेश जारी होणार आहेत.

1 जुलै 2021 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनातील मूळ वेतनावर देण्यात येणारा माहागाई भत्ता 17 टक्के वरुन 28 टक्के करण्यात आला आहे.
या वाढीमध्ये 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे.
परंतु 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत महागाई भत्त्याचा दर 17 टक्के इतकाच राहणार आहे.
महागाई भत्ता वाढ 1 ऑक्टोबर 2021 पासून रोखीने देण्यात येणार आहे.

 

Web Title : 7th Pay Commission | Good news for government employees! 11% increase in inflation allowance on the eve of Dussehra and Diwali

 

हे देखील वाचा :

Aryan Khan Drugs Case | NCB सांगत असलेला मुख्य साक्षीदार किरण गोसावी सराईत गुन्हेगार ! पुण्यासह 3 ठिकाणी गुन्हे दाखल

Narayan Rane | भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नारायण राणेंना स्थान नाही; चर्चेला उधाण

Dating App Bumble | सेक्सआणि जवळीकता याबाबत भारतीय तरूणांच्या विचारात मोठा बदल, ‘बम्बल’ सर्वेक्षणातून झाला खुलासा

 

Related Posts