IMPIMP

Aaditya Thackeray | वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता टाटा एअरबसचा प्रकल्प देखील महाराष्ट्रातून गुजरातला पळवला – आदित्य ठाकरे

by nagesh
Gujarat Election results | gujarat assembly election 2022 shiv sena chief uddhav thackeray congratulates bjp for gujarat victory wishes congress for himachal victory

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन  वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn), बल्क ड्रग पार्कनंतर (Bulk Drug Park) आता टाटा एअरबसचा (Tata Airbus) मालवाहू विमाने तयार करणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या प्रकल्पाची किंमत 22 हजार कोटी रुपये होती. त्यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर टीका केली आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि विरोधकांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कदाचित वेदांना फॉक्सकॉनप्रमाणेच या प्रकल्पाची देखील उद्योग मंत्र्यांना माहिती नसावी. टाटा एअरबसचा एमओयू जर महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi Government) तयार झाला होता, तर काहीही करुन एअरबसचा प्रकल्प राज्यात आणू, असे उद्योग मंत्र्यांनी का सांगितले होते? त्यांनी राज्यातील युवकांची फसवणूक केली आहे. ते खोटे बोलत आहेत. ते इतके महिने शांत होते आणि आता प्रकल्प गेल्यावर आपली बाजू मांडत आहेत. उदय सामंत महाविकास आघाडीत मंत्रीपदावर काम करत होते. आज पुन्हा गद्दार सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. प्रत्येक मंत्र्याला हे माहीत आहे की, एखाद्या कंपनीचा एखाद्या राज्यासोबत करार झाला, तर तो प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेता येत नाही. मग तुम्ही कोणत्या आधारावर एअर बसचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार, असे सांगत होता, असे प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले.

 

यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर देखील टीका केली.
इतर राज्यांमधील मुख्यंमंत्री त्यांच्या राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी फिरत असतात.
मात्र, आमचे मुख्यमंत्री मंडळे, दहिहंडी, राजकीय फोडाफोडी, राजकीय भेटी सोडून कुठेही फिरत नाहीत.
शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) असतील किंवा नवीन पटनायक (Naveen Patnaik)
असतील हे मुख्यमंत्री जसे दुसऱ्या राज्यात जातात, तसे आपले मुख्यमंत्री तीन महिन्यात एकतरी राज्यात गेले आहेत
का? त्यामुळे वेदान्त फॉक्सकॉन, बल्क ड्रग आणि मेडिकल डिव्हाईस प्रकल्पानंतर राज्यातील चौथा मोठा प्रकल्प
राज्यातून निघून गेल्याचे दु:ख वाटत आहे असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Aaditya Thackeray | aditya thackeray replied to uday samant alligation on mva government regarding tata airbus

 

हे देखील वाचा :

IND vs NED | ‘या’ भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करणे विराटपेक्षा अवघड आहे, नेदरलँड्सच्या गोलंदाजांची प्रतिक्रिया

Tata Airbus Project | राज्यातील उद्योग गुजरातला पळवण्यासाठीच मिंदे सरकार आले; सुभाष देसाईंची जोरदार टीका

Jayant Patil | टाटा एअरबस प्रकल्पावरुन जयंत पाटील संतापले, राज्य सरकारला केला सवाल, ‘अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?’

 

Related Posts