IMPIMP

Aaditya Thackeray | फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत दिली खोटी माहिती, आदित्य ठाकरे म्हणाले – ‘ही महाराष्ट्राची दिशाभूल…’

by nagesh
Aaditya Thackeray | vedanta foxconn project aaditya thackeray on devendra fadnavis

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन  – Aaditya Thackeray | महाराष्ट्रात येणारे वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn), टाटा एअरबस (Tata Airbus) यासारखे चार मोठे प्रकल्प लागोपाठ गुजरातला गेल्याने सध्या महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. विरोधी पक्षांनी सुद्धा शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) यावरून घेरले. मात्र विरोधक याचे खापर जुन्या महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत वेदांता-फॉक्सकॉन मविआच्या काळात राज्याच्या बाहेर गेल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी काही जुन्या बातम्या पत्रकारांना वाचून दाखवल्या. परंतु फॉक्सकॉन आणि वेदांता-फॉक्सकॉन हे दोन वेगवेगळे प्रकल्प असून फडणवीसांनी दिशाभूल केल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Shivsena Leader Aditya Thackeray) यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, पत्रकार परिषदेत एवढे खोटे बोलल्याचे मी कधीही ऐकले नव्हते किंवा पत्रकार परिषदेतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहिले नव्हते. देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या टीमकडून चुकीची माहिती मिळाली आहे. फडणवीसांनी उल्लेख केलेला प्रकल्प जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे. हा प्रकल्प 2016 साली देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ योजनेतून महाराष्ट्रात आला होता. ही फॉक्सकॉनची कंपनी असून महाराष्ट्रात मोबाइल निर्मिती करणार होती.

 

पुढे या प्रकल्पाने तामिळनाडूमध्ये चाचपणी केली आणि हा प्रकल्प अमेरिकेत गेला. आता त्याठिकाणी उत्पादन सुरू आहे.
हा प्रकल्प जरी फॉक्सकॉन कंपनीचा असला तरी यामध्ये आणि वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे.
वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प ‘सेमीकंडक्टर चिप’साठी होता.

 

आदित्य पुढे म्हणाले, फडणवीसांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेला प्रकल्प ‘मोबाईल’ फोनसाठी होता.
त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती असेल की, कृपा करून महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचे सोडून द्या.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सोडून द्या. दोन्ही वेगळे प्रस्ताव आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Aaditya Thackeray | vedanta foxconn project aaditya thackeray on devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Indian Medical Association | इंडीयन मेडीकल अशोशिएशनची वार्षिक बैठकीत डॉक्टरांची मारामारी

Pune Metro, PMRDA, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणने (NHAI) पुणे (PMC), पिंपरी चिंचवड (PCMC) महापालिकेला 803 ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले – मनपा आयुक्त विक्रम कुमार

Airtel ग्राहकांसाठी गुड न्यूज! मोबाईल रिचार्ज करा आणि मिळवा 25 टक्के कॅशबॅक!

 

Related Posts