IMPIMP

Pune Metro, PMRDA, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणने (NHAI) पुणे (PMC), पिंपरी चिंचवड (PCMC) महापालिकेला 803 ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले – मनपा आयुक्त विक्रम कुमार

by nagesh
Pune PMC Budget | Budget of Pune Municipal Corporation on March 24; The budget is likely to be in excess of Rs 8500 crore

शहरातील वाहतूक कोंडी सुटण्याच्या मार्गावर

 

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन Pune Metro-PMRDA-PMC-PCMC | शहरातील वाहतूक सुरळित राहावी यासाठी मेट्रो, पीएमआरडीएसह काही संस्थांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांना तब्बल ८०३ ट्रॅफिक वॉर्डनची फौज उपलब्ध करून दिली आहे. ज्या भागामध्ये प्रकल्पांच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे, तसेच अन्य गर्दीच्या चौकांमध्ये जिथे पोलिस मनुष्यबळा अभावी नियंत्रणामध्ये अडचणी येताहेत त्याठिकाणी या मनुष्यबळाचा वापर होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Pmc commissioner Vikram Kumar) यांनी दिली. (Pune Metro-PMRDA-PMC-PCMC)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पावसाळ्यांच्या चार महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत: पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतील पाईपलाईनच्या कामांसाठी खोदाई केलेले रस्त्यांना मोठ्याप्रमाणावर खड्डे पडल्याने वाहतूक अगदी ठप्पच झाली होती. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीपुर्वीच्या खरेदीदरम्यान तर येथील रस्त्यांवर पायी चालणे देखिल कठीण झाले होते. एकीकडे रस्त्यांवर कोंडी होत असताना नियंत्रण करणारे वाहतूक पोलिसांचे अस्तित्व दिसत नव्हते. याउलट पोलिस आडवाटेला कोपर्‍यामध्ये थांबून दंडात्मक कारवाई करतानाचे सर्रास चित्र होते. यावरून पोलिस दलावर (Pune Traffic Police) सर्वच स्तरावरून टीका होत होती. परंतू पोलिसांकडून मनुष्यबळाचा अभाव हे कारण सांगून जबाबदारी झटकण्याकडे कल अधिक दिसून येत होता. (Pune Metro-PMRDA-PMC-PCMC)

 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याची गंभीर दखल घेतानाच वाहतूक नियंत्रणासाठी तात्पुरते मनुष्यबळ उपलब्ध करून देउ असे आश्‍वासन दिले होते. पोलिस आयुक्त अमतिाभ गुप्ता यांनी दिवाळीच्या काळात पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचार्‍यांना वाहतूक नियंत्रणाचे अतिरिक्त काम सोपविले होते. तसेच महापालिका, पीएमआरडीए, मेट्रोने प्रकल्पांच्या ठिकाणी वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार मागील तीन ते चार दिवसांत टप्प्याटप्प्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी ८०३ ट्रॅफीक वॉर्डन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणने (National Highways Authority of India) पुण्यासाठी ३३ आणि
पिंपरी चिंचवडसाठी ३३, महामेट्रोने २६४, पीएमआरडीएने दिवस आणि रात्रपाळीमध्ये ४१६, गोल्फ क्लबने ३७
आणि सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीने २० ट्रॅफिक वॉर्डन पुरविले आहेत.
यासर्वांची यादी अगदी मोबाईल क्रमांकासह वाहतूक पोलिस अधिकार्‍यांकडे देण्यात आली आहे,
अशी माहिती महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वाहतूक पोलिसांच्या यादीतील ३० टक्के रस्त्यांवर खड्डे दुरूस्ती

वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडीला प्रामुख्याने रस्त्यांवरील खड्डे कारणीभूत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले.
पोलिसांनी शहराच्या विविध भागातील ७५ रस्त्यांची यादी तीन दिवसांपुर्वी प्रशासनाला पाठविली आहे.
या यादीनुसार मागील तीन दिवसांत ३० टक्के रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत.
पाउस थांबल्याने खड्डे बुजविण्याच्या प्रक्रियेतील अडथळे दूर झाले आहेत. येत्या आठ दिवसांत सर्व खड्डे बुजविण्यात येतील.
तसेच रस्त्यांच्या रिसरफेसिंगची सुमारे १०० कोटी रुपयांचे कामे देखिल लवकरच हाती घेण्यात येतील.

 

– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक 

 

Web Title :- Pune Metro, PMRDA, National Highways Authority (NHAI) provide 803 Traffic Wardens to Pune (PMC), Pimpri Chinchwad (PCMC) – Municipal Commissioner Vikram Kumar

 

हे देखील वाचा :

Airtel ग्राहकांसाठी गुड न्यूज! मोबाईल रिचार्ज करा आणि मिळवा 25 टक्के कॅशबॅक!

Shobha Rasiklal Dhariwal | ‘श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थानाचा जीर्णोद्धार लवकरच पूर्ण करणार’ – शोभाताई आर धारीवाल

Indian Air Force Recruitment | भारतीय वायुसेनेत अग्नीविरांची भरती जाहीर

 

Related Posts