IMPIMP

Indian Medical Association | इंडीयन मेडीकल अशोशिएशनची वार्षिक बैठकीत डॉक्टरांची मारामारी

by nagesh
Indian Medical Association | madhya pradesh jabalpur doctors fight at ima state working committee meeting video viral

जबलपूर : वृत्तसंस्था – इंडीयन मेडीकल अशोशिएशनची (Indian Medical Association) वार्षिक बैठक जबलपूर मध्य प्रदेश (Jabalpur, Madhya Pradesh) येथे संपन्न होत आहे. यावेळी या बैठकीचे रुपांतर आखाड्यात झाले आणि सुसंस्कृत म्हणविणारे डॉक्टर पोरांसारखे एकमेकांच्या अंगावर जाऊन मारामारी करायला लागले. त्यामुळे इंडीयन मेडीकल अशोशिएशनची (Indian Medical Association) वार्षिक बैठक गाजत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या बैठकीस राज्यभरातून मोठ-मोठे डॉक्टर आले होते. यावेळी समारंभ सुरु असताना वाद पेटला आणि शाब्दिक वादाचे रुपांतर सर्वप्रथम धक्काबुक्कीत आणि नंतर एकमेकाला खाली पाडून हाणामारीत झाले. याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रसारीत होत आहे.

 

 

प्राप्त माहितीनुसार, कार्यक्रमाची सुरुवात आयएमएचे जिल्हाध्यक्ष अमरेंद्र पांडे (Dr. Amrednra Pandey) यांच्या भाषणाने झाली.
यावेळी त्यांनी भोपाळ, उज्जैन, इंदूर आणि ग्वाल्हेरमधील आयएमएच्या सदस्य डॉक्टरांवर टीका केली.
या टीकेला ग्वाल्हेरच्या सदस्यांनी विरोध केला.
अध्यक्ष अमरेंद्र पांडे यांनी मंचावरुन ग्वाल्हेरच्या सदस्यांना सभागृहाच्या बाहेर जाण्याची मागणी केली आणि ठिणगी पडली.
यावेळी ग्वाल्हेरच्या सदस्यांनी मंचावर जात अध्यक्षांना धक्का देत बाजूला काढले.
त्यांनी देखील सारखीच प्रतिक्रिया दिली आणि मारामारीला तोंड फुटले. वाढती मारामारी पाहून इतर डॉक्टर मदतीला धावून आले आणि त्यांनी मारामारी सोडवली. हा वाद बराच वेळ सुरु होता. त्यानंतर डॉक्टर अमरेंद्र पांडे यांनी माफी मागितली आणि वाद शांत झाला. आयएमएचे (IMA) सदस्य डॉक्टर राकेश पाठक (Dr. Rakesh Pathak) यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध केला असून, प्रकरणाची चौकशी करुन दोषी डॉक्टरांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Indian Medical Association | madhya pradesh jabalpur doctors fight at ima state working committee meeting video viral

 

हे देखील वाचा :

Pune Metro, PMRDA, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणने (NHAI) पुणे (PMC), पिंपरी चिंचवड (PCMC) महापालिकेला 803 ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले – मनपा आयुक्त विक्रम कुमार

Airtel ग्राहकांसाठी गुड न्यूज! मोबाईल रिचार्ज करा आणि मिळवा 25 टक्के कॅशबॅक!

Shobha Rasiklal Dhariwal | ‘श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थानाचा जीर्णोद्धार लवकरच पूर्ण करणार’ – शोभाताई आर धारीवाल

 

Related Posts