IMPIMP

Abhijeet Sawant – Indian Idol Show | ‘छोटे छोटे कार्यक्रम करून फीसाठी जमवायचो पैसे’ ! अभिजित सावंतने सांगितला ‘इंडियन आयडल’पर्यंतचा त्याचा संपूर्ण प्रवास

by nagesh
Abhijeet Sawant - Indian Idol Show | abhijeet sawant talk about how he gave the audition and seleted for indian idol show

सरकारसत्ता ऑनलाईन  –  Abhijeet Sawant – Indian Idol Show | इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. त्यानंतर
अभिजीत सावंत हे नाव प्रत्येकाच्या तोंडात ऐकायला मिळायचे. त्यानंतर मोहब्बते लुटाऊंगा या गाण्याने तर त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते.
यामुळे अभिजीत प्रसिद्धीच्या झोतात आला होता. नुकताच अभिजीतने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अभिजीतने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी अभिजीत म्हणाला, “मी साधारण एकवीस वर्षांचा असताना माझे पदव्युत्तर शिक्षण चालू होते.
त्याचबरोबर माझे गाणे देखील सुरू होते. त्यावेळी मला संगीत क्षेत्रात करिअर करायचं असे वाटतं होते मात्र योग्य मार्गदर्शन करण्यासाठी असे कोणीच नव्हते.
माझे आई-वडील देखील संगीत क्षेत्रातील नसल्यामुळे मला फार गोष्टींचा सामना करावा लागत असे.
यानंतर हळूहळू मी गणपती, नवरात्र अशा कार्यक्रमांमध्ये गाणी म्हणायला सुरूवात केली.
म्हणजे छोटे छोटे कार्यक्रम सोसायटीमध्ये जाऊन घ्यायचो त्यावेळी फारशी कमाई व्हायची नाही पण त्या पैशातून
मी माझे गाणे शिकण्यासाठी लागणाऱ्या फीची सोय करून घ्यायचो. एक दिवशी मी आणि माझे मित्र मुंबईतील
दादर परिसरात फिरत असताना इंडियन आयडलचे ऑडिशन सुरू होते.
त्यावेळी हा कार्यक्रम नेमका काय होता हे कोणालाही ठाऊक नसल्याने गर्दी कमी होती. टाइमपास म्हणून मी आणि माझे मित्र त्या रांगेत जाऊन उभे राहिलो. माझ्या मित्रांपैकी काही तिथून निघून गेले मात्र मी तिथेच उभा राहिलो आणि ऑडिशन दिली”.
(Abhijeet Sawant – Indian Idol Show)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुढे बोलताना अभिजीत म्हणाला, “त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमोशन व्हायला सुरुवात झाली आणि हा कार्यक्रम किती
मोठा आहे हे सगळ्यांना समजायला लागले.

अशाप्रकारे छोट्या स्टेजवरून मी इंडियन आयडल सारख्या मोठ्या स्टेजवर पोहोचलो आणि या माध्यमातून मी
जगासमोर आलो हा प्रवास माझ्यासाठी खूपच कठीण होता मात्र तितकाच प्रेरणादायी देखील होता”.

Web Title :- Abhijeet Sawant – Indian Idol Show | abhijeet sawant talk about how he gave the audition and seleted for indian idol show

हे देखील वाचा :

Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या ! ‘अशा व्यक्तीने राज्यपालासारख्या पदावर असू नये’ – शरद पवार

Supriya Sule On CM Eknath Shinde | ‘डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य पणाला लावले, त्यामुळे महत्वाच्या पदावर असणाऱ्यांनी श्रद्धा ठेवली पाहिजे, अंधश्रद्धा नाही’

Gulabrao Patil On Aditya Thackeray | ‘आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची वेळ आली नसती’

Related Posts